आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल सट्ट्याचे जयपूर कनेक्शन, एकास अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयपीएल सामन्यादरम्यान पोलिसांनी छापा मारून रंगेहाथ पकडलेल्या तिघांचे जयपूरशी कनेक्शन उघड झाले आहे. जयपूर येथून फोन लाइन देणाऱ्या सुनील दरयाणी यास आर्थिक गुन्हे शाखेने जयपूर येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

२९ मे रोजी रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये अंतिम सामना सुरू असताना गारखेडा परिसरातील आर.बी. हिल्स, विजयनगर येथील फ्लॅट नंबर वर पोलिसांनी छापा मारून नरेश धर्माजी पोतलवाड (रा. एकदंत अपार्टमेंट, फ्लॅट नं. १७, श्रेयनगर) अजित अर्जुन आगळे (रा. रमानगर) यांना अटक केली. हे तिघे ऑनलाइन सट्टा घेत असल्याचे दिसून आले. तर टीव्ही सेंटर येथून प्रकाश रूपचंद ठोले यास पकडले होते. ठोलेकडे सट्ट्यासाठी वापरण्यात येणारी फोन लाइन आढळली होती. या कारवाईत पोलिसांनी पीबीएक्स बॉक्ससह ४० ते ४५ मोबाईल, संगणक, एलसीडी जप्त केले होते.

पोलिसांच्या तपासात नरेश पोतलवाड यास जयपूर येथील बुकीने लाइन दिल्याचे समोर आले. त्याानुसार पोलिसांनी जयपूर येथे जाऊन सुनील श्यामलाल दरयाणी (रा. सिंधी कॉलनी, आदर्शनगर, जयपूर) यास अटक केली. दरयाणी यास न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोतलवाड हा ऑनलाइन सट्टेबाजीत अत्यंत माहीर आहे. मे २०१५ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्यासह बड्या धेंडांना अटक केली होती. तेव्हा सट्ट्याचे कनेक्शन दिल्ली येथून होते. पोलिसांनी दिल्लीतून काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये पोलिसांनी नरेशला रंगेहाथ पकडले. या वेळी सट्ट्याचे कनेक्शन दिल्लीऐवजी जयपूर असल्याचे समोर आहे. ऑनलाइन सट्ट्यासाठी मोबाइल सिमकार्डद्वारे पीबीएक्सद्वारे लाइन जोडली होती. यातील बहुतांशी सिमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेले होते. काही नागरिकांच्या कागदपत्रांवर हे सिमकार्ड घेण्यात आले होते.