आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कल्पना नसते : सतीशचंद्र माथूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : राज्यात होणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मला कल्पना नसते. हा निर्णय शासन पातळीवर होता. त्यांच्या बदल्यांची मला माहिती होत नसल्याने यावर मी अधिक बोलूही शकत नाही, असे राज्याचे पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांनी स्पष्ट केले. बुधवारी पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील, अतिरिक्त पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांची उपस्थिती होती. 

गेल्या काही महिन्यांत राज्यभरातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामागे नेमके काय कारण आहे? या बदल्या होत असताना आपल्याशी चर्चा होते का, असे माथूर यांना विचारले असता त्यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या माझ्या अखत्यारीत येत नाहीत, असे सांगितले. राज्यात आर्थिक गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यात एक पोलिस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नियुक्त करण्यात आला आहे.
 
 या सर्व अधिकाऱ्यांना नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात आठ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियुक्तीनंतर पुन्हा त्यांना आठ दिवस प्रशिक्षण देण्यात येईल, असेही माथूर यांनी सांगितले. राज्यातील पोलिस यंत्रणा अधिक तंत्रशुद्ध आणि ऑनलाइन केली जाईल. सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि त्यांच्या प्रकटीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत वर्षभरात आठ ते दहा टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा होत होती. मात्र, २०१६ मध्ये हे प्रमाण ३२ टक्क्यांपर्यंत गेले असल्याचेही माथूर यांनी सांगितले. 

आयपीएसअधिकाऱ्यांची बदली करताना महासंचालकांशी चर्चा व्हावी : पोलिसमहासंचालक हे राज्यांच्या पोलिसांचे प्रमुख आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार शासनाला आहेत. मात्र, निर्णय घेताना महासंचालकांशी चर्चा करावी, अशी मागणी निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी तथा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संताराम माने पाटील यांनी केली.

पोलिस खात्यात सकारात्मक वातावरण 
पोलिसांचादृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर सकारात्मक होताना दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून माथूर म्हणाले की, राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याचे काम युद्धपातळीपर सुरू आहे. ग्रामीण भागातील ठाण्यांचे रूप पालटण्यासाठी ७० कोटींचा निधी मिळाला अाहे. पोलिस आयुक्त आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांना याबाबत अधिकार देण्यात आले असून पोलिसांसाठी विशेष रिपेअरिंग बोर्ड तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...