औरंगाबाद- एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचा आज वाढदिवस. (5 ऑक्टोबर) महाराष्ट्रातील तरुणाईपुढेही ते आदर्श आहेत. विश्वास यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी रुपाली यांचे सहकार्य, पाठबळही आहे. नवऱ्याची मैत्रीण, सहकारी म्हणून सक्षमपणे त्या आपली भूमिका पार पाडतात. आज आम्ही आपल्यासाठी विश्वास नांगरे-पाटील आणि रुपाली यांच्याविषयी रंजक माहिती घेऊन आलो आहोत.
जावयाने औरंगाबादने दिले वेगळे वळण..विश्वास नांगरे पाटील यांचे करिअर व वैवाहिक जीवनाची सुरूवातच औरंगाबादेतून झाली. आयपीएस झाल्यावर 1999 मध्ये त्यांची प्रोबेशनवर पहिली बदली औरंगाबाद जिल्ह्यात झाली. फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड या विभागात त्यांनी काम केले. कन्नडचे कल्याण औताडे यांच्याशी विश्वास यांची मैत्री झाली. त्यांनीच पद्माकर मुळे यांची मुलगी रूपाली हिच्या लग्नाचा प्रस्ताव आणला होता. कल्याण औताडे यांनी मुळे कुटुंबीयांशी बोलणी करून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम निश्चित केला. विश्वास त्यांच्या मित्रांसोबत मुलगी बघायला गेले.
दोनदा झाला मुलगी बघण्याचा कार्यक्रम..
मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात रुपाली यांना काही वेळच विश्वास यांच्या समोर येता आले. त्यामुळे पहिल्या भेटीत या दोघांमध्ये फार बोलणे झाले नाही. पाहण्यासाठी चौघे आलेले असल्यामुळे नेमका मुलगा कोणता, असा प्रश्न रूपाली यांना पडला होता. यामुळे पुन्हा दुसर्या दिवशी भेटण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार रूपाली एका नातेवाइकासोबत कॅफे हाऊसमध्ये भेटण्यासाठी आल्या. या वेळी दोघांनी तब्बल तासभर चर्चा केली.
वडिलांचा विरोध मावळला..
नांगरे पाटील यांच्या वडिलांना मराठवाड्यातील मुलगी मान्य नव्हती. कोल्हापूर, सांगली किंवा सातार्याची मुलगी सून म्हणून आण, असा खाक्याच त्यांनी दिला होता, पण अखेर विश्वास यांच्या पसंतीला मान देत वडिलांनी लग्नाला होकार दिला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, रुपाली आहेत बेस्ट होममेकर, विश्वास यांना युनिफॉर्म'मध्ये पाहून रुपाली झाल्या होत्या 'इम्प्रेस'.., असे जुळले लग्न..