आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंबग ज्योतीप्रिया सिंग यांची पुण्याला बदली; महाराष्ट्रातील 104 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीमती ज्योतीप्रिया सिंग यांची जालना येथून पुणे शहर पोलिस उपायुक्त पदी बदली झाली आहे. - Divya Marathi
श्रीमती ज्योतीप्रिया सिंग यांची जालना येथून पुणे शहर पोलिस उपायुक्त पदी बदली झाली आहे.
मुंबई/औरंगाबाद - महाराष्ट्रातील 60 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने भारतीय पोलिस सेवेसह (आयपीएस)  राज्य पोलिस सेवेतील 104 पोलिस अधिक्षक, पोलिस उपायुक्त अधिकाऱ्यांची बदली करण्‍यात आली आहे. मुंबई शहर पोलिस उपायुक्तपदी महाराष्ट्र पोलिस सेवेतील अशोक पठाण यांच्यासह सहा आयपीएसची बदली झाली आहे. त्यात राजीव जैन, डॉ. सौरभ त्रिपाठी, एन.डी. रेड्डी, दिलीप सावंत, एस.व्ही. पाठक, संजय येनेपुरे यांचा समावेश आहे.

दबंग महिला पोलिस अधिकारी अशी ओळख असलेल्या आयपीएस ज्योतीप्रिया सिंह यांची जालना पोलिस अधिक्षक पदावरुन पुणे शहर पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे.
 
अमितेशकुमारांची मुंबईला बदली
 धडाडीचे पोलिस आयुक्त अशी ओळख निर्माण केलेले औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबईत बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर यशस्वी यादव औरंगाबादला येणार आहेत. तर, औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी नागपूर येथील डॉ. आरती सिंह यांची नियुक्ती झाली आहे. 
 
- औरंगाबाद येथील पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांची ठाणे उपायुक्तपदी तर, संदीप आटोळे यांची गोंदिया येथे अप्पर अधिक्षकपदी बदली झाली आहे. 
- औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक पदी नागपूर येथील डॉ. आरती सिह यांची बदली झाली आहे. 
 
नाशिक पोलिस अधिकारी बदल्या
- पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी आयपीएस संजय दराडे यांची नियुक्ती झाली आहे. पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे यांची बदली झाली आहे. 
- मालेगाव अपर पोलिस अधिक्षक राकेश ओला यांची पदोन्नतीवर उपायुक्त नागपूर येथे बदली झाली. 
- मालेगाव अपर पोलिस अधिक्षकपदी आयपीएस हर्ष पोद्दार यांची नियुक्ती झाली आहे. 
- पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त विजय पाटील, पोलिस उपयुक्त दत्ता कराळे यांची बदली झाली आहे.
- माधुरी कांगने व श्रीकृष्ण कोकाटे हे नाशिक मधील नवे पोलिस उपायुक्त.
 
खान्देश  
 दत्तात्रय कराळे - पोलिस अधिक्षक, जळगाव 
 बच्चन सिंग - अपर पोलिस अधिक्षक जळगाव 
 एस. राम कुमार - पोलिस अधिक्षक, धुळे 
 
 पुणे 
  बी. जी. गायकर - पोलिस उपायुक्त, पुणे शहर 
 अशोक मोराळे - पोलिस उपायुक्त, पुणे शहर 
 संजय डी. बावीस्कर - पोलिस उप आयुक्त, पुणे शहर 
 श्रीमती तेजस्विनी सातपुते - अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण 
 डॉ. संदीप पखाले - अपर पोलिस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण 
  
 विदर्भ 
  कृष्णकांत उपाध्याय - पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर 
  राहुल माकणीकर - पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर 
  राकेश ओला - पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर 
  एस. चैतन्य - पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर
  राकेश कलासागर - पोलिस अधीक्षक, अकोला 
  एस. के. मीना - पोलिस अधीक्षक बुलढाणा 
  श्रीमती नियती ठाकरे - पोलिस अधीक्षक, चंद्रपूर 
  श्रीमती निर्मलादेवी एस. - पोलिस अधीक्षक वर्धा 
  श्रीमती मोक्षदा अनिल पाटील - पोलिस अधीक्षक वाशिम 
  निलेश भरणे - पोलिस उप आयुक्त, अमरावती शहर 
  डॉ. हरीबालाजी एन. - अपर पोलिस अधीक्षक गडचिरोली 
  
  मराठवाडा 
श्रीमती दिपाली धाटे - पोलिस उप आयुक्त, औरंगाबाद शहर 
अजय ढाकणे - पोलिस उप आयुक्त औरंगाबाद शहर 
अजित अंबादास बोराडे - अपर पोलिस अधीक्षक, अंबेजोगाई, बीड 
दिलीप झळक - पोलिस अधीक्षक, परभणी 
चंद्रशेखर मीना - पोलिस अधीक्षक, नांदेड 
बसवराज तेली - पोलिस अधीक्षक, हिंगोली 
रामनाथ पोकळे - पोलिस अधीक्षक जालना 
काकासाहेब डोळे - अपर पोलिस अधीक्षक, लातूर
मंगेश शिंदे - अपर पोलिस अधीक्षक, नांदेड 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या निवडक बदल्या... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...