आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वास नांगरे पाटील म्हणतात, ... तर आत्महत्या केली असती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळ्यात संवेदनशीलपणे हाताळलेल्या 3 जातीय दंगली. सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या हायप्रोफाइल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी केलेले दोन हात.. नेहमी चर्चेत राहणारे युवा पोलिस अधिकारी म्हणजे विश्वास नांगरे पाटील. त्यांची 13 वर्षांची कारकीर्द अनेक ‘सिंघम’ स्टाइल प्रसंगांनी ठासून भरली आहे. मात्र त्यांच्या या कामगिरीला साथ, प्रेरणा देण्याचे काम करतात त्यांच्या पत्नी औरंगाबादच्या रूपाली नांगरे पाटील. म्हणूनच रूपा या विश्वास यांच्या आयुष्यातील कणा आहेत.

पोलिस अधिकार्‍याचे आयुष्य हे अनेक आव्हानांनी भरलेले असते. आयएएसचा पर्याय असताना काही जण आयपीएसची निवड करून खाकीवर्दी स्वीकारतात. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे विश्वास नांगरे पाटील अशापैकीच एक. धडाकेबाज, अभ्यासू पोलिस अधिकारी अशी त्यांची ख्याती. घराबाहेर त्यांचा कामाचा आवाका वाढत असताना त्यांचा ‘होम डिपार्टमेंट’ कंट्रोल करणारा रिमोट म्हणजे औरंगाबादच्या रूपाली पद्माकर मुळे आताच्या रूपा विश्वास पाटील यांच्या हातात. ज्येष्ठ उद्योगपती, राजकारणी अशी मुळे कुटुंबीयांची ख्याती. विश्वास नांगरे पाटलांच्या कामगिरीवर त्यांनी विश्वास ठेवला आणि आपली एकुलती एक मुलगी त्यांना देण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद ठरले टर्निंग पॉइंट
नांगरे पाटील यांच्या करिअर आणि वैवाहिक जीवनाचा र्शीगणेशा औरंगाबादेतून झाला. आयपीएस झाल्यावर 1999 मध्ये त्यांची प्रोबेशनवर पहिली बदली औरंगाबाद जिल्ह्यात झाली. त्यांनी फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड या विभागात काम केले. या वेळी कन्नडचे कल्याण औताडे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. त्यांनीच पद्माकर मुळे यांची मुलगी रूपा हिच्या लग्नाचा प्रस्ताव आणला. येथूनच करिअर आणि भावी आयुष्यासाठी औरंगाबाद त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले.

दोनदा मुलगी बघण्याचा कार्यक्रम
कल्याण औताडे यांनी मुळे कुटुंबीयांशी बोलणी करून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम निश्चित केला. विश्वास सहकारी प्रशिक्षणार्थी आयपीएस कृष्णप्रकाश आणि इतर दोन मित्रांसोबत मुलगी बघायला गेले. या वेळी फक्त काही वेळासाठी रूपा त्यांच्यासमोर आल्या आणि लगेच निघूनही गेल्या. पाहण्यासाठी चौघे आलेले असल्यामुळे नेमका मुलगा कोणता, असा प्रश्न रूपा यांना पडला होता. यामुळे पुन्हा दुसर्‍या दिवशी भेटण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार रूपा एका नातेवाइकासोबत कॅफे हाऊसमध्ये भेटण्यासाठी आल्या. या वेळी दोघांनी तब्बल तासभर चर्चा केली. मोठय़ा लाडात वाढलेल्या रूपा यांना विश्वास यांनी पोलिस अधिकार्‍याच्या खडतर आयुष्याची माहिती दिली. अनेक संकटे पेलावी लागतात, दर दोन-तीन वर्षांत बदल्या होतात, रात्री-अपरात्री ड्यूटीवर जावे लागते, अशा व्यक्तीची जीवनसंगिनी होण्यास तुला आवडेल का? असा सवाल त्यांनी केला. यास रूपा यांनी होकार दिला.

वडिलांचा विरोध मावळला
नांगरे पाटील यांच्या वडिलांना मराठवाड्यातील मुलगी मान्य नव्हती. कोल्हापूर, सांगली किंवा सातार्‍याची मुलगी सून म्हणून आण, असा खाक्याच त्यांनी दिला होता, पण अखेर विश्वास यांच्या पसंतीला मान देत वडिलांनी लग्नाला होकार दिला.

टेलिफोन बूथ, एके-47 ची सुरक्षा
साखरपुडा ते लग्न यामध्ये 6 महिन्यांचा कालावधी होता. दरम्यान, औरंगाबादेतील प्रोबेशनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना गडचिरोली, काश्मीर आणि भोपाळ येथे अटॅचमेंट प्रोग्रामसाठी जावे लागले. ते 3 महिने काश्मीरमध्ये राहिले. त्याकाळी मोबाइल फोन किंवा ई-मेल नव्हते. एसटीडी बूथवरून फोन करावे लागत असे. ते बूथमध्ये गेले की दोन एके-47 धारी सुरक्षारक्षक बाहेर थांबायचे. त्यांचा कॉल तास-तासभर चालायचा. याचे लोकांना आश्चर्य वाटत असे. या काळात त्यांनी काश्मीरमधून रूपाला एवढी पत्रे पाठवली की आता आयुष्यभर एकही पत्र लिहिले नाही, तरी तिला राग नाही येणार असे ते मिश्किलपणे सांगतात.