आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकी विद्यार्थ्याचा विद्यापीठात हृदयविकाराने मृत्यू, तीन महिन्यांतील दुसरी घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी वालिद सादेक अहमद याचा हृदयविकाराने शुक्रवारी (26 जुलै) विद्यापीठ परिसरात मृत्यू झाला. इराकी विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची तीन महिन्यांतील ही दुसरी घटना असून, इराकी विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली आहे.

वाहेद सादिक अहमद हा मित्रांसमवेत दुपारी दोनच्या सुमारास नेहमीप्रमाणे विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील रस्त्यावरून पायी जात होता. अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्यामुळे तो खाली बसला आणि बघता बघता कोसळला. मित्रांनी तातडीने त्याला ओम्नी कार अँम्ब्युलन्समधून घाटीत आणले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये लगेचच एका खासगी रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आल्यानंतर पुन्हा घाटीमध्ये आणण्यात आले. या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी म्हणाले, छातीत वेदना होत असल्याच्या कारणावरून त्याला आणण्यात आले होते; परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याचे शनिवारी (27 जुलै) शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे म्हणाले, वाहेद हा एम. ए. इतिहास विषयाचा दुसर्‍या वर्षाचा विद्यार्थी होता.