आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irragation Department Deprived From Three And Half Crores Water Revenu

पाटबंधारे विभागाला साडेतीन कोटींच्या पाणीपट्टीवर सोडावे लागणार पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - मराठवाड्यातील शेतीसाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ पिण्यासाठीच पाणी शिल्लक असल्याने या धरणातून शेतीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे पाटबंधारे विभागाला सुमारे साडेतीन कोटींच्या पाणीपट्टीवर पाणी सोडण्याची नामुष्की आली आहे.

जायकवाडी धरणावरील दोन्ही कालव्यांतून शेतीसाठी पाणी पुरवले जाते, परंतु यंदा धरणात पाणी नसल्याने व आहे ते पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याने कालवे कोरडे आहेत. या कालव्यात पाणी सोडल्यास पाटबंधारे विभागाला दरवर्षी तीन कोटी रुपयांची पाणीपट्टी मिळते. यंदा मात्र यावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. पैठणचा डावा कालवा 208 किमी लांबीचा असून त्याची वहन क्षमता 100.02 घनमीटर प्रतिसेकंद आहे. या कालव्यामुळे पैठण, जालना, परभणी जिल्ह्यांतील 141640 हेक्टर्स जमीन पाण्याखाली येते. उजवा कालवा 132 कि.मी.लांबीचा असून त्याची वहन क्षमता 63.71 घनमीटर प्रतिसेकंद आहे. यावर अहमदनगर, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांतील 46640 हेक्टर्स जमीन ओलिताखाली येते. धरणाच्या पाण्याखाली येणार्‍या शेतकर्‍याकंडून प्रतिहेक्टर्सप्रमाणे पाणीपट्टी वसूल केली जाते. ऊस उत्पादकांकडून सर्वात जास्त प्रतिहेक्टर 7500 रुपयांप्रमाणे पाणीपट्टी वसूल केली जाते. इतर पिकांसाठी वेगवेगळे पाणीपट्टी दर अकारले जातात. यंदा मात्र शेतीला कुठल्याच कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाला तीन कोटींचा फटका बसला आहे.

ठिबकला प्राधान्य

दोन्ही कालवे 8 महिने सुरू असतात. याद्वारे शेतीला शेकडो टीएमसी पाणी सोडण्यात येते. मात्र, शेतकरी या पाण्याचा योग्य वापर करत नाहीत. यापुढे कालव्यातून पाणी सोडण्यापूर्वी शेतकर्‍यांना ठिबकचे महत्त्व सांगून त्याची सक्ती करण्याचा प्रयत्न करणार आहेत. जे शेतकरी ठिंबक सिंचन करतील त्यांनाच पाणी देण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

पैठणच्या मुख्य डाव्या कालव्याचे बांधकाम 1976 मध्ये पूर्ण झाले. या कालव्यातून परभणी जिल्ह्यास पाणीपुरवठा करण्यात येतो. कालव्याचा परिसर काळ्या मातीचा असल्याने कालव्याचे अस्तरीकरण सतत घसरत जाऊन तळाशी मलबा जमा होत होता. त्यामुळे कालव्याची विसर्ग क्षमता 1600 क्युसेक्सपर्यंत घटली होती. यामुळे सिंचन कार्यक्रम राबवणे कठीण होत होते. मात्र, मध्यंतरी कालव्याचे काम झाले व पिकांसाठी पाण्याची मागणी आल्याने विसर्ग क्षमतेत वाढ झाली.


पाणीपट्टी नसल्याने भुर्दंड
यंदा शेतीसाठी पाणी देण्यात न आल्याने डाव्या व उजव्या कालव्याच्या पाण्यावर होणारी पाणीपट्टी वसूल झाली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाला तीन कोटींचा फटका बसला आहे. एस. पी. भर्गोदेव, कार्यकारी अभियंता.