आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irragation Scame : Notice By Politican , Responsible The Officers Devendra Shirke

सिंचन घोटाळा : सूचना राज्यकर्त्यांच्या, जबाबदार अधिकारीच - देवेंद्र शिर्के

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कोणत्याही कामासाठी प्रशासकीय नोंदीनुसार अधिकारीच जबाबदार असतात. तरीही आम्ही काम करण्यापूर्वी तांत्रिक बाबी तपासलेल्या असतात. त्यामुळे आमचा बळीचा बकरा केला जात असल्याचे म्हणणे योग्य ठरणार नाही. राज्यकर्त्यांनी कामे करण्याची सूचना केली, त्यानुसार सर्व काही योग्य झालेले असले तरी प्रथमदर्शनी अधिकारीच जबाबदार आहेत, अशा शब्दांत सिंचन घोटाळा प्रकरणी खातेनिहाय चौकशीत ठपका ठेवण्यात आलेले जलसंधारण महामंडळाचे संचालक देवेंद्र शिर्के यांनी बुधवारी कबुली दिली आहे.

राज्यातील 70 हजार कोटी रुपयांच्या कथित सिंचन घोटाळा प्रकरणी विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक शिर्के यांच्यावर खातेनिहाय चौकशीत ठपका ठेवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर वाल्मी येथील विश्रामगृहात ‘दिव्य मराठी’शी बोलताना शिर्के म्हणाले की, सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तथापि, मी एकट्यानेच हा घोटाळा केल्याचे चित्र उभे केले जात आहे. चौकशीनंतर सर्व काही समोर येईल. वडनेरे समितीच्या अहवालात केवळ मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले नसल्याचे म्हटले आहे. त्याआधारेच मेंढेगिरी अहवालात काम झाले नसल्याचे नमूद करण्यात
आले आहे. मुख्य अभियंत्यांनी काळानुरूप निर्णय घेत कामे केली होती. प्रत्यक्षात काम करण्यापूर्वी शासनाकडून मार्गदर्शक सूचना घ्यायला हव्या होत्या. परंतु तसे झालेले नाही. त्यातूनच घोटाळा झाल्याचा निष्कर्ष मेंढेगिरी यांनी काढला आणि तसा अहवाल सादर केला. आता त्याचेच भांडवल करत आम्हाला दोषी दाखवण्यात येत आहे.
मी एकटाच नाही, 70 जण आहेत
सिंचनाचा महाघोटाळा अशी प्रसिद्धी केली गेली. प्रत्यक्षात तसे नसून चौकशीनंतर खरे घोटाळेबाज समोर येतील. यात मी एकटाच नाही. 70 जणांची नावे आहेत, असे शिर्के म्हणाले.