आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrigation Scam News In Marathi, Anti Corruption Burau, Divya Marathi

‘पाटबंधारे’च्या घोटाळेबाजांकडून 10 किलो सोने, कोट्यवधी रूपये जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/जालना - जालना जिल्ह्यामध्ये दोन पाझर तलावांच्या कामांत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाच अधिका-यांना औरंगाबादेत अटक करण्यात आली. या अधिका-यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) टाकलेल्या धाडीत दहा किलोपेक्षा अधिक सोन्यासह बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. यात उपअभियंता भास्कर जाधव यांच्या सिडको एन-4मधील निवासस्थानातून 6 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी दोन पाझर तलावांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार 8 जून 2010 रोजी मुंबईत लोकायुक्तांकडे केली होती. त्यानंतर जालना एसीबीच्या चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. दाभाडीतील तलाव क्रमांक 5 व पापळ शिवारातील पाझर तलाव क्रमांक 8 यांचे एप्रिल 2007 ते 2009 दरम्यान काम केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते. दानवे यांनी 2010 मध्ये यासंदर्भात लेखी तक्रार केली होती. जालना येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता रघुवीर गणपतराव यादव (आता औरंगाबादेत), उपविभागीय अभियंता भास्कर जाधव (सेवानिवृत्त), शाखा अभियंता श्रीनिवास बाबाजी काळे, तत्कालीन शाखा अभियंता आणि औरंगाबाद पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर कोरडे, कंत्राटदार व भोकरदन येथील गणेश मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुभाष देशपांडे यांना या गैरव्यवहारात दोषी धरण्यात आले आहे.
यांची कारवाई : एसीबीचे औरंगाबादेतील पोलिस अधीक्षक सं. दे. बावीस्कर आणि अप्पर पोलिस अधीक्षक बा. भ. पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक एच.व्ही. गिरमे, उपअधीक्षक सुरेश वानखडे, निरीक्षक व्ही. बी. चिंचोले, एस. एम. मेहेत्रे, अशोक टेहरे, संतोष घायडे, किशोर पाटील, नंदू शेंडीवाले, संजय उदगीरकर, प्रदीप उबाळे आणि अश्विनी भोसले आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, पाचही आरोपींना जालना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने सर्वच आरोपींना 5 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वाढीव रक्कम अशी
रघुवीर यादव, भास्कर जाधव, श्रीनिवास काळे यांनी दाभाडी पाझर तलाव क्र. 5 4 लाख 61 हजार 478 रूपये तर रघुवीर यादव, भास्कर जाधव व रामेश्वर कोरडे यांनी पापळ पाझर तलाव क्र. 8 मध्ये रुपये जास्तीचे काम केल्याचे दर्शवून सदर पाझर तलावासाठी 9 लाख 65 हजार 573 रूपयांची वाढीव रक्कम अदा केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बदनापूर व टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एच. व्ही.गिरमे यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

असा केला घोटाळा
० तलावाच्या साइटवर न जाता घरीच बसून मोजमाप पुस्तिका तयार केल्या.
० तलाव क्रमांक 5 मध्ये 4
लाख 61 हजार रुपयांची वाढीव रक्कम मंजूर केली. तर तलाव क्रमांक 8 मध्ये 9 लाख 65 हजार 573 रुपयांची वाढीव रक्कम कंत्राटदारांना देण्यात आली.
औरंगाबादेत धाडी : जालना एसीबीचे पोलिस उपअधीक्षक एच. व्ही. गिरमे यांच्या पथकाने आरोपींच्या औरंगाबादेतील घरी धाडी टाकल्या. पाच आरोपींशिवाय तोडोळे (जाफराबाद) येथील गुरुदेव मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष ढवळे व राजेंद्र खोमणे हेही यात आरोपी आहेत.

घोटाळ्यातील आरोपी व जप्त केलेली संपत्ती
भास्कर जाधव
6.255
किलो ग्रॅम सोने
1 .81
कोटींची संपत्ती
रघुवीर यादव
1.700
किलो ग्रॅम सोने
51.47
लाखांची संपत्ती
श्रीनिवास काळे
17
तोळे सोने
81.13
लाखांची संपत्ती
रामेश्वर कोरडे
8.64
लाखांची संपत्ती
जालना येथील तत्कालीन शाखा अभियंता
सुभाष देशपांडे
भोकरदन येथील कंत्राटदार, गणेश मजूर सहकारी संस्थेचे तत्कालीन चेअरमन