आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेच बागडेंची पकड ढिली झाली? डॉ. गाडेकरांना जवळ' देवगिरी' गमावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फुलंब्री मतदारसंघात तीन वेगवेगळ्या निवडणुकांत आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला. बागडे हे विधानसभेचे अध्यक्ष असल्याने येथील विजय तसेच पराभवाला वेगळे महत्त्व आहे. १० वर्षे येथील आमदार राहिलेले डॉ. कल्याण काळे यांच्या बाजूने ते गेले. फुलंब्री तसेच आैरंगाबाद तालुका खरेदी-विक्री संघ, बाजार समितीनंतर देवगिरी साखर कारखाना ही तिन्ही सत्ताकेंद्रे डॉ. काळे यांनी स्वकीयांचा विरोध असतानाही ताब्यात घेतली. खरेदी-विक्री संघात बहुमत नसतानाही बागडे यांनी तो ताब्यात घेतला असला तरी कौल मात्र त्यांच्या विरोधातच होता.

योगायोग आहे की, बागडे यांची पकड ढिली होत चालली की डॉ. काळे पुन्हा पकड मजबूत करताहेत, अशी चर्चा या मतदारसंघात आहे. फुलंब्री, औरंगाबाद तालुक्यांतील खरेदी-विक्री संघ डॉ. काळेंच्या पॅनलने जिंकले. कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक जागा जिंकल्या अन् आता कारखाना एकतर्फीच्याही पुढे जाऊन ताब्यात घेतला. फक्त एक जागा बागडेंच्या गटाला मिळू शकली. असे असले तरी खरेदी-विक्री संघ ताब्यात घेत बागडे यांनी राजकीय बूज राखली.

पुढे वाचा, पावती नानांच्या नावावर?
बातम्या आणखी आहेत...