औरंगाबाद - बंगळुरूतून आयएस (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेचे
ट्विटर अकाउंट चालवणा-या मेहदी मसरूर बिस्वास याचे औरंगाबादसह मराठवाडा, मालेगाव आणि जवळच्या काही शहरांत जवळपास एक हजार फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आल्याने ‘रॉ’ने एटीएस व पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मेहदीला पकडल्यानंतर त्याच्या फॉलोअर्सची तपासणी सुरू आहे. त्यात मराठवाड्यातील अनेकांची नावे समोर येत असल्याचे समजते. सध्या त्याची खातरजमा करण्याचे काम सध्या सुरू असून तोपर्यंत येथील मराठवाड्याचे एटीएस तसेच पोलिसांनाही सजग राहण्याची सूचना रॉ या संस्थेकडून देण्यात आल्या आहेत. एटीएस पथकाने काहींवर वॉच ठेवण्यासही सुरुवात केली आहे; पण अजून कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. पण लवकरच काही जणांनी चौकशी होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.