आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is There Any Mechanism For Industry Water To Divert Drought Hit Area ?

उद्योगाचे पाणी दुष्काळी भागात नेण्याची यंत्रणा आहे का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उद्योगांचा पुरवठाबंद करून वाचणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात पोहोचवण्याची यंत्रणा आहे का, असा सवाल उद्योजकांनी केला आहे. अशी यंत्रणा नसेल तर पाणी कपातीची योजना व्यर्थ ठरणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उद्योजक मानसिंग पवार यांनी उद्योजकांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दारू, सिगारेट, गुटखा उत्पादन आणि विक्रीबाबत सर्वच राजकीय पक्ष आणि सरकारांचे धोरण नेहमी संभ्रमाचे राहिले आहे. नागरिकांचे आरोग्य की महसूल याबाबत निश्चित निर्णय झाला नसल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चा होऊन हा प्रश्न कायमचा सोडवण्याची गरज आहे.
मराठवाड्यात मद्यनिर्मिती उद्योगाकडून राज्याला दरवर्षी चार हजार कोटींचा महसूल मिळतो. मार्च, एप्रिल, मे महिन्यात त्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मद्य निर्मिती बंद झाल्यास हा महसूल मिळणार नाही. कारखाने बंद केल्यावर उपलब्ध होणारे पाणी गरजूंपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा नसल्यास कारखाने बंद करणे अयोग्य ठरेल. मद्यनिर्मितीकडून मिळणारा महसूल दुष्काळग्रस्त भागात कायमस्वरूपी योजनांसाठी उपयोगात आणला जावा, अशी आग्रही मागणी होऊ शकते. बिअर, मद्यार्क कंपन्यांत ग्रामीण भागातील लोकच नोकरीस आहेत. त्यांना काही महिन्यासाठी घरी पाठवणार का? असा सवाल निवेदनात आहे.
उद्योजकांचीही नाळ ग्रामीण
भागाशी जोडली गेली आहे. म्हणूनच नुकत्याच झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात उद्योग जगताने योगदान दिल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. निवेदनावर राम भोगले, उल्हास गवळी, मुनिष शर्मा, मुकुंद भोगले, उमेश दाशरथी, मिलिंद कंक, अनिल भालेराव, सी.जे.पाठक, अनिल सावे, मुकुंद कुलकर्णी, एन.श्रीराम यांची नावे आहेत.