आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ishu Sindhu Take Action Against Criminal Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूतस्कर, अवैध धद्यांविरुद्ध दहा दिवसांत मोहीम - ईशू सिंधू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ग्रामीण भागातील गुन्हेगारी, अवैध धंद्यांना आळा घालणे, हेच माझे ध्येय आहे. त्यासाठी येत्या दहा दिवसांत धडाकेबाज कारवाई केली जाईल, असा वज्रनिर्धार नवनियुक्त पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक पोलिस शिपाई माझा गुप्तहेर आहे. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती माझ्यापासून कुणीही दडवून ठेवू शकत नाही, असा विश्वासही सिंधू यांनी ‘दिव्य मराठी’शी खास बातचीत करताना बोलून दाखवला.
जळगाव येथील कोट्यवधी रुपयांच्या घरकुल घोटाळ्यात धडाडीने तपास केल्यानंतर प्रकाशझोतात आलेले सिंधू यांनी महिनाभरापूर्वी औरंगाबादच्या पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी दहा दिवसांनी धडक मोहीम हाती घेणार असल्याचे ते म्हणाले. औरंगाबादच्या अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारताच सिंधू यांनी गोदावरी नदीच्या पात्रात गेल्या अनेक वर्र्षांपासून सुरू असलेल्या वाळूच्या तस्करीकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी वाळू तस्करीत डॉन समजल्या जाणा-या आशिष शर्माला मुंबईत मंत्रालयाच्या आवारात अटक करून औरंगाबादेत आणले. त्याची दोन तास कसून चौकशी केली. या संदर्भात सिंधू म्हणाले, वाळू तस्करीचे हे रॅकेट खूप मोठे आहे. त्याच्या मुळाशी असलेल्या बड्या धेंडांची आता गय केली जाणार नाही. सर्व उपविभागीय पोलिस अधिका-यांची कार्यालये आणि पोलिस ठाण्यांना भेटी देऊन आपण संबंधितांना कर्तव्यपालनाविषयी सूचना
दिल्या आहेत. विशेषत: बीट मार्शल यांनी गावागावात जाऊन सात ते आठ तास लोकांमध्ये मिसळून काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. अतिरेकी कारवाया असो की एखादा अन्य गुन्हा. कोणत्याही प्रकरणात हलगर्जीपणा करू नका, असे निर्देश दिल्याचे सिंधू यांनी सांगितले.