आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Member Imran Moajjam Arrested In Aurangabad

औरंगाबादमध्ये "इसिस'चे धागेदारे , वैजापूरहून अटक केलेल्या इम्रानचे नेटवर्क रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशभरात २२ जानेवारी रोजी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्थेने) छापा टाकत इसिसच्या संपर्कात असलेल्या किंवा स्वयंघोषित इसिसचे सदस्य म्हणणाऱ्या १४ जणांना ताब्यात घेतले. त्यात वैजापूर येथील इम्रान मोअज्जम पठाण या २६ वर्षीय युवकाचाही समावेश आहे. इम्रानचे औरंगाबादेत कायम येणे-जाणे, संपर्क होता. तो येथीलच एका महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्यामुळे इसिसचे धागेदोरे औरंगाबादेत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इम्रान नेमका कुणाला भेटत होता, याचा तपास सुरू झाला असून त्याच्या वर्तुळातील सर्वजण स्थानिक पोलिस, एटीएस आणि एनआयएच्या रडारवर अाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इम्रानने औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात ११ वी, १२ वीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर शहरातील एका संस्थेमधून हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला. त्याने मुंबई येथील तुर्भे एमआयडीसीत काही काळ नोकरी करताना मुक्त विद्यापीठातून बीसीए केले.

अजून कारवाई संपली नाही
मराठवाड्यात अजून काही इसिसशी संशयित असून त्यांच्यावर सुरक्षा यंत्रणा नजर ठेवून आहे. त्यांनादेखील लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगिले. गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणेचे इम्रानच्या वैजापूर आणि औरंगाबादेतील हालचालींवर लक्ष होते. तो इसिस, इंडियन मुजाहिदीन किंवा सिमीचा सक्रिय कार्यकर्ता आहे का, याचा तपशील गोळा केला जात होता. इसिसचे भारतातील नेटवर्क वाढत असल्याचे गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केल्यावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. दोन वर्षापूर्वी गंगापूर येथून साबणे सिनेमागृहा जवळून एकाला ताब्यात घेतले होते. बंदी असलेल्या सिमी संघटनेचा तो सदस्य होता. त्याच्याविरूध्द ठोस पुरावे आढळून आले नाही. मात्र त्याच्यावर नजर कायम होती. एटीएसच्या रेकॉर्डनुसार शहर आणि जिल्ह्यातील १९ जणावर एनआयए नजर ठेऊन होती. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून येणारे मेल, फेसबुक प्रोफाईलवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. तत्पूर्वी गंगापुर, बीड, खामगाव, धुळे, नंदुरबार येथेही सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याने अतिरेकी टोळ्यांनी गावे बदलली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुढील स्लाईडव क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...