आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISO Certificate For Zilha Parishad School In Auranagbad Taluka

"आयएसओ'साठी दिले ग्रामस्थांनीे आर्थिक पाठबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विकासाबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत पश्चिम महाराष्ट्र कायम मराठवाड्याच्या पुढे असल्याचे नेहमीच बोलले जाते; परंतु अलीकडे ही परिस्थिती बदलली आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषद आणि ग्रामस्थांनी आघाडी घेतली असून पश्चिम महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत सर्वाधिक शाळा आयएसओ प्रमाणित आहेत,
तितक्या (७) शाळा एकट्या औरंगाबाद तालुक्यातच आगामी काळात होतील. शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्याने पश्चिम महाराष्ट्रालाही मागे टाकल्याचे यावरून दिसून येते. पश्चिम महाराष्ट्रातून बदलून आलेल्या एका अधिकाऱ्यानेही ही बाब जाहीरपणे मान्य केली आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षक तसेच अधिकारी गेल्या काही दिवसांत टीकेचे धनी ठरले असले, तरी ही मंडळी जोमाने काम करत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
त्यांना ग्रामस्थांचीही साथ मिळत आहे. आयएसओ प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात नाही. त्यामुळे बेंबवाडी (१ लाख ५२ हजार), लांडकवाडी (१ लाख ७२ हजार), सांजखेडा (२ लाख १ हजार), आपदगाव (५० हजार) येथील ग्रामस्थांनी ही अडचण दूर केली आहे. कमी लोकसंख्या असतानाही येथील ग्रामस्थांनी हा खर्च पेलला. मार्चमध्ये या शाळा आयएसओ मानांकित होतील.
एकट्या औरंगाबाद तालुक्यात जि.प.च्या ७ शाळांना आयएसओ मिळणार
मुलांना चांगले शिक्षण मिळणार असेल, तर आम्हीही खर्चाचा विचार करणार नाही, असे त्यांनी दाखवून दिले. खासगी शाळांत चांगले शिक्षण मिळते, हा समजच जिल्हा परिषदेच्या शाळांनी खोडून काढला आहे.
^आमच्या गावातील जि. प. शाळेतील शिक्षक चांगले शिकवतात. फक्त परिसर चांगला ठेवण्याची गरज होती. त्यासाठी आम्ही खिशात हात घातला. आता आमची मुले खासगी शाळेपेक्षाही चांगल्या वातावरणात शिक्षण घेतात संपतराव अहिरे,ग्रामस्थ, सांजखेडा
^आम्ही ग्रामीण शिक्षणावर भर देतोय. खासगी शाळांपेक्षा आम्हीही चांगले शिक्षण देऊ शकते, हे दिसून येईल. येत्या काही दिवसांत पूर्ण चित्र बदलेल. प्रत्येक केंद्रातून एक शाळा आयएसओ प्रमाणित असेल, असे आम्ही ठरवले आहे. अभिजित चौधरी, सीईओ, जिल्हा परिषद