आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिला भारतीय यंत्रमानव नव्या वर्षात ठेवणार चंद्रावर पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नव्यावर्षात भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) एक नवा अध्याय लिहिणार अाहे. २०१७च्या मध्यावर भारताची चांद्रयान-२ ही मोहीम वेग घेत असून अस्सल स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार झालेला पहिला भारतीय यंत्रमानव चंद्रावर पाऊल ठेवणार आहे, अशी माहिती इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ रितू क्रिधाल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. शास्त्रज्ञ होण्यासाठी काय करावे लागते या विषयावर त्यांनी सहजसोप्या टिप्सही विद्यार्थ्यांना दिल्या. रितूक्रिधाल याइस्रो या संस्थेत कशा दाखल झाल्या? त्यांचे बालपण कुठे गेले? शास्त्रज्ञ प्रयत्नपूर्वक होता येते काय? त्यासाठी कसा अभ्यास करावा लागतो? या प्रश्नांसह भारत जगाच्या तुलनेत अवकाश संशोधनात कुठे आहे, यावर रितू यांनी आपली स्पष्ट मते व्यक्त केली. प्रश्नोत्तर रूपात त्यांच्याशी झालेला हा संवाद...
{गेल्या वीस वर्षांत आपल्या देशाने या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. भारत जगात या मोहिमेत सध्या पाचव्या स्थानावर आहे. अमेरिका, रशिया, चीन, जपाननंतर आता भारताचा नंबर लागतो. मंगळयान मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
^भारतीय शास्त्रज्ञचंद्रावर पाऊल कधी ठेवेल?
{तोक्षण फार दूर नाही असे मला वाटते. कारण २०१७ मध्ये इस्रोची चांद्रयान मोहीम-२ सुरू होत आहे. याच वर्षात भारताचा स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झालेला यंत्रमानव प्रथम चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली की पहिला भारतीय मानव चंद्रावर पाठवण्याची तयारी निश्चित सुरू होईल.

^मंगळग्रहावर जीवसृष्टी आहे असे बोलले जाते, ते खरे आहे काय?
{होय, ते खरे असू शकते असे आता वाटत आहे. कारण भारतानेच प्रथम मंगळावर पाणी असल्याचे जगाला सांगितले त्याबद्दल नासा या संस्थेने भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. तेथे मिथेन, कार्बन,अमोनिया हे वायू वातावरणात आढळले आहेत. आपण पाठवलेला मॉम हा उपग्रह तेच संशोधन करीत आहे. तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावरच सखोल संशोधन सुरू आहे.

^तुम्हीशास्त्रज्ञ कशा झालात? इस्रोपर्यंत कशा पोहोचलात?
{मी मूळची लखनऊ शहरातली. बालपण तेथे गेले. भौतिकशास्त्रात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. केल्यावर बंगळुरूच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम.टेक. केल्यावर थेट इस्रोत शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या वेळी कस्तुरीरंगन हे अध्यक्ष होते. १९९७ साली मी इस्रोत दाखल झाले. तेथे मंगळयान मोहिमेत सर्व तरुण शास्त्रज्ञांची टीम होती. त्यात माझा समावेश होता.

^शास्त्रज्ञहोण्यासाठी कोणते गुण असावे लागतात? अभ्यास कसा करावा लागतो?
{शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा मी संशोधन क्षेत्र असे म्हणेन. त्यात ठरवून करिअर करता येते. पण त्यात तुम्ही ज्या विषयात संशोधन करणार आहात, त्यातील बेसिक गोष्टी माहीत असाव्या लागतात. उदाहरणार्थ, भौतिकशास्त्र आणि गणिताचा पाया पक्का असेल तर या क्षेत्रात तुम्ही निश्चितच संशोधक म्हणून करिअर करू शकता. त्याला फार काही मोठ्या आणि वेगळ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. पाठांतर करून मिळवलेले मेरिट असेल तर ते ज्ञान संशोधनात फारसे कामी येत नाही. तेथे विषयाचा पाया पक्का असावा लागतो. तोच तुम्हाला अवघड पेचातून सोडवण्यास मदत करतो.
बातम्या आणखी आहेत...