आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरपार भगदाड पडले, बीड बायपासवर जीवघेणा धोका,पूलही खचल्याने कधीही होऊ शकते दुर्घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड बायपास मार्गावर गट क्रमांक १०८ लगत असलेला एक नळकांडी पूल खचल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच पुलाच्या मधोमध भले मोठे भगदाड पडले आहे. ट्रकसारखे एखादे वाहन आले आणि त्याचे टायर चुकून या भगदाडात अडकले तर अख्खा रस्ताच खचून वाहन थेट खाली जाऊ शकते. त्यात हा हायवे असल्याने अशी घटना घडलीच तर मागून येणाऱ्या वाहनांमुळे फार मोठी दुर्घटना होऊ शकते. पण अनेक दिवस होऊनही याबाबत यंत्रणा गंभीर नाही हे विशेष.

हिवाळे लॉनसमोरील गट क्रमांक १०८ मध्ये बीडबायपास मार्गावर हा पूल आहे. या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जागतिक बँक प्रकल्पाची आहे. या पुलाच्या आणि त्यावर पडलेल्या भगदाडाची दुरुस्तीबाबत नागरिकांनी विभागाकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र, कुणीही त्याकडे गांभिर्याने पाहिले नाही.

डीबी स्टार पाहणी
चमूनेया रस्त्याची पाहणी केली. या पुलाचे लोखंडी कठडे आणि एका बाजूने रस्त्याच्या कडाही ढासळलेल्या आहेत, तर पुलावर दोन ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. चुकून यावरून एखादे अवजड वाहन गेल्यास हा पूलच कोसळू शकतो. मात्र, जागतिक बँक प्रकल्प, देखभाल दुरुस्तीचा ठेका घेणाऱ्या सद््भाव जाॅइंट व्हेंचरचे मुंबईचे ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहे. या मार्गावरून धावणाऱ्या लाखो वाहनांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, जीव घेणे खड्डे....