आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद स्टील उद्योगांमुळे 170 कोटी व्हॅट बुडाला, ७००० कामगार बेकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जालन्यातील स्टील उद्योगाला लागलेल्या घरघरीचा फटका राज्यालाही बसतो आहे. जालना स्टील उद्योगातून राज्य सरकारला वर्षाकाठी 387 कोटी रुपये मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) रूपात मिळतात. मात्र, आता 50 टक्के उद्योग बंद पडल्याने सरकारचा 170 कोटी रुपयांचा व्हॅट बुडाला आहे. कारखाने बंद पडल्याने सुमारे 7000 कामगारांवर बेरोजगारीची, स्थलांतराची वेळ आली आहे.

या संदर्भात स्टील उद्योजक नितीन काबरा यांनी सांगितले, या औद्योगिक क्षेत्रातील 51 स्टील कारखान्यांची क्षमता 16.19 लाख मेट्रिक टन आहे. मात्र मंदी, वाढते वीज दर आणि उत्पादन खर्चातील वाढ या मुळे सध्या उद्योगांकडून केवळ 48 टक्केच क्षमताउर्वरित. वापरात आहे. याचा थेट परिणाम रोजगारावरही झाला आहे. जालना स्टील उद्योगाला 209 मेगावॅट इतकी वीज लागते. मात्र 22 कारखाने बंद पडल्याने वीज वापर 160 मेगा वॅटवर आला आहे. वीज दरवाढीचा फटका स्टील उद्योगाला मोठ्या प्रमाणात बसल्याचे हे द्योतक आहे.

उद्योजक मुकूंद कुलकर्णी यांनी सांगितले, जालना हे केवळ मराठवाडाच नव्हे तर राज्यासाठी महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. औद्योगिक वातावरणाची मराठवाड्यातील पहिली मुहूर्तमेढ जालन्याची आहे. भूमीपूत्रांचे उद्योग हे जालन्याचे वैशिष्ट्य आहे. जालन्याच स्टील उद्योग चांगला रुजला आहे. ज्यावेळी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याच्या तयारीत होता त्यावेळीच चीनच्या स्वस्त स्टीलचे आक्रमण झाले. त्यामुळे जालन्याच्या स्टील उद्योगावर विपरीत परिणाम झाला. यामुळे जालन्याच्या भूमीपूत्रांची कोंडी झाली आहे. चीनच्या सरकारने ज्याप्रमाणे सवलती दिल्या त्याचप्रमाणे राज्य व केंद्र सरकारने स्टील उद्योगाला सवलती दिल्या तरच हा उद्योग पुन्हा भरभराटीस येईल.

बेरोजगारी वाढली :
जालना स्टील उद्योगात पाच ते सात हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो. गेल्या वर्षभरात २२ कारखाने बंद झाल्याने प्रत्यक्षरित्या सुमारे ३५०० ते ४००० कामगारांवर स्थलांतर, बेरोजगारीची वेळ आली आहे. या शिवाय ट्रक, हमाली, व्हेंडर, वाहतूक व इतर कामासाठी लागणाऱ्या ३५०० ते ४००० अप्रत्यक्ष कामगारांवरही बेरोजगारीची पाळी आली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणतात उद्योजक...