आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीच्या समितीने काढले बांधकाम विभागाचे वाभाडे, पितळ उघडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यासहविदर्भ खान्देशातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या घाटी रुग्णालयात कोट्यवधींची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे त्वरित पूर्ण करण्याऐवजी केवळ कामाची किंमत वाढवण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. यामुळे घाटीतील विद्यार्थ्यांसह रुग्णांचे नुकसान होत आहे. असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा घाटीच्या समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिला आहे.
रुग्णांच्या सोयीसाठी घाटीतील प्रत्येक विभाग सुसज्ज करण्यासाठी शासनाने आवश्यक निधी दिला. मात्र, अभियंता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर कामे पूर्ण करण्यात दिरंगाई केली आहे. समितीने सप्टेंबर रोजी सा.बां. िवभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दंत महाविद्यालयाच्या लेटरहेडवर पत्र देऊन त्यांचे पितळ उघड केले आहे. दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. पी. डांगे यांनी स्पष्ट केले की, मुखरोग निदान क्ष-किरणशास्त्र विभाग, टेबल टेनिस विभाग, ग्रंथालय, मध्यवर्ती भांडार, मुख शल्यचिकित्साशास्त्र, परीक्षा हॉल, मुला-मुलींचे वसतिगृह, शस्त्रक्रिया विभागासह इतर विभागांतील कामे अपूर्ण आहेत. यामध्ये विशेषत: प्रयोगशाळेची इमारत तयार असताना केवळ विजेअभावी तेथे काम सुरू झालेले नाहीत. हेच कारण पुढे करीत सा. बां. विभागाने इमारतीचे हस्तांतरण केले नाही. परिणामी रुग्णांसह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांना संशोधन करता येत नाही. याशिवाय दंत महाविद्यालय रुग्णालय इमारतीमध्ये लिफ्ट उभारणीच्या कामाला मागील दोन वर्षांपासून निधी उपलब्ध झाला नाही. यामुळे कनिष्ठ अभियंत्यांनी लिफ्टच्या जागेवरही बांधकाम केले आहे. सध्या त्या कामासाठी सुमारे १८ लाखांचा निधी उपलब्ध झाला असून केवळ बांधकामामुळे लिफ्टचे काम करता येत नाही.

कामे लवकरच पूर्ण करणार
घाटीतीलकामे छोट्या कारणांमुळे पूर्ण झालेली नाहीत. यानंतर सर्व कामे त्वरित पूर्ण करून दिली जातील. प्रवीणकिडे, मुख्यअभियंता, सा. बां.विभाग

वसतिगृह तयार, मात्र किरकोळ कामामुळे हस्तांतरण नाही
मुला-मुलींच्या अद्ययावत वसतिगृहाचे तीन मजले तयार झालेले आहेत. केवळ एका मजल्याचे काम बंद ठेवल्याने मुलांना योग्य निवासस्थानात राहता येत नाही. मुलींच्या वसतिगृह लिफ्टसाठी कोटी ९७ लाख रुपये तर मुलांच्या १२० कक्षांच्या वसतिगृहासाठी कोटी ९८ लाख रुपये मंजूर आहेत. केवळ दोन्ही वसतिगृहांतील एका मजल्याचे काम अपूर्ण असल्याने डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असेही पत्रात नमूद केलेले आहे.
घाटीत उभारण्यात आलेल्या सभागृहाचे कामही अर्धवट राहिले आहे. दुसऱ्या छायाचित्रात कॅन्टीनचे काम पूर्ण होऊनही ती सुरू नाही.

वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उभारल्या जात असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीचे काम क्षुल्लक कारणामुळे अर्धवट राहिले आहे.

पैसे असूनही कामे नाहीत
शासनानेतीन वर्षांपासून लिफ्टसाठी निधी दिला. मात्र, विटांचे बांधकाम पाडण्यासाठी निधी नसल्याचे कारण पुढे करून काम केले जात नाही. परिणामी रुग्णांसह डॉक्टरांना अडचणींना सामोरे जावे लागते. एस.पी. डांगे, अधिष्ठाता,शासकीय दंत महाविद्यालय