आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी घरे किरायाने, भलत्यांचाच कब्जा, ताबा सोडता कर्मचाऱ्यांनीच ठेवले पोट भाडेकरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेबर कॉलनीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानांमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी बस्तान बांधले आहे. अंडी, कपडे किरकोळ विक्रेते, तसेच गुंड प्रवृत्तीचे लोक सरकारी निवासस्थानाचा सर्रासपणे लाभ घेत आहेत. ज्यांच्या नावावर ही घरे आहेत, त्या सेवानिवृत्त किंवा बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी घराचा ताबा सोडता हे पोटभाडेकरू ठेवले असल्याचे डीबी स्टार तपासामध्ये उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत कर्मचाऱ्यांच्या नाववरही घरे आहेत. ही गोष्ट प्रशासनाला माहीत असतानाही अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

विश्वासनगर लेबर कॉलनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वार्टर्समध्ये एकूण ३५० घरे आहेत. त्यापैकी केवळ ४० घरांमध्येच शासकीय कर्मचारी राहतात आणि त्यांच्या पगारातून नियमितपणे भाडेकपात होते. उर्वरित घरे सेवानिवृत्त, आणि मृत कर्मचारी यांच्या नावे आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतरही त्यांनी घरांचा ताबा सोडला नसल्याने घरे त्यांच्याच नावे आहेत. त्यामुळे ते स्थानिक लोकांकडून भाड्याचे पैसे घेऊन त्यांना राहायला घरे देत आहेत. एवढेच नाही तर या लोकांनी तेथील सेवा केंद्रही भाड्याने दिले आहे.
केवळ नोटिसांचा सोपस्कार
ज्यांनीघरे सोडली नाहीत अशा कर्मचाऱ्यांना सा. बां. विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. तर मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. या नोटिसा बजावून विभागाला काय साध्य करायचे होते? मृत कर्मचाऱ्यांच्या घरावर नोटिसा लावल्याने घर ताब्यात येणार आहे, असे विभागाला वाटले का? अादी प्रश्न उपस्थित होतात. लेबर कॉलनीतील सर्व क्वॉर्टर्स जीर्ण झाले असून ते राहण्यालायक नाहीत. यासंदर्भात विभागीय आयुक्तांना एक निनावी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आयुक्तांनी बैठक घेऊन तातडीने कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, अद्यापही सा. बां. विभागाने कोणत्याच हालचाली केल्या नाहीत.
लेबर कॉलनीतीचनाही तर शहरातील सर्वच शासकीय निवासस्थानांमध्ये पोटभाडेकरू ठेवण्यात आलेले आहेत. विभागीय आयुक्तांना निवेदन देऊनही कोणतीच कारवाई केली जात नाही. यामुळे ज्यांना गरज आहे त्या कर्मचाऱ्यांना हक्काचे क्वार्टर मिळत नाही. भलतेच लोक याचा फायदा घेत आहेत. अंबादासहिवराळे, सचिव,कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ
विभागीयआयुक्तांच्याअध्यक्षतेखाली आम्ही ठोस कारवाई करणार आहोत. यासंदर्भात आयुक्तांसोबत आम्ही वारंवार बैठका घेतल्या आहेत. ज्यांच्या नावे घरे आहेत, त्यांना नुकत्याच नोटिसादेखील पाठवल्या आहेत. आता एक-एक करून सर्वांना तेथून काढण्याची कारवाई करणार आहोत. वृषालीगाडेकर, कार्यकारीअभियंता, सा. बां. विभाग

- घरक्रमांक ११० : येथेकपड्यांचा व्यवसाय करणारे लोक राहतात. या कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या कुणीच सरकारी नोकरी केलेली नाही.
- घर क्रमांक११२ :येथे राहणारी व्यक्ती हॉटेलमध्ये काम करते. पूर्वी येथे सबनीस नावाचे कर्मचारी राहत होते. मात्र, त्यांनी घराचा ताबा सोडलेला नाही.
घरक्रमांक १०९ : येथेजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोकरी करणारा कर्मचारी राहत होता. आता ते निवृत्त झाले आहेत, पण घराचा ताबा सोडलेला नाही. आता येथे कपडे विक्रेते राहतात. विशेष म्हणजे पारेषण कंपनीकडून त्यांनी बेकायदेशीर वीज मीटरसुद्धा घेतले आहे.
- घरक्रमांक १०८ : येथेराहणारी व्यक्ती सरकारी नोकरी करत नाही. येथेसुद्धा पारेषण कंपनीने या व्यक्तीच्या नावे वीज मीटर दिले आहे.

- घरक्रमांक १३९ : हेघर सा. बां. विभागात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याच्या नावावर आहे. आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत, पण घराचा ताबा सोडलेला नाही.
- घर क्रमांक १६८, २९, ९५, ५०, १०२, २४, ०२, ३१, १२ आणि ०५ येथेसुद्धा पोटभाडेकरू ठेवण्यात आले आहेत.
तक्रारींकडे सोईस्कर दुर्लक्ष
१५सप्टेंबर २०१२ रोजी कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. ज्या घरांमध्ये पोटभाडेकरू राहत आहेत, त्यांची यादीसुद्धा सोबत जोडली होती. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करून निवासस्थाने रिकामी करावी, अशी मागणीही केली होती. मात्र, आजपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

क्वॉर्टरमध्येफॅब्रिकेशन वर्कशॉप
निवासस्थानामध्येठेवण्यात आलेल्या पोटभाडेकरूने फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरू केले आहे. ज्या कर्मचाऱ्याच्या नावे हे घर आहे, त्यानेच इथे पोटभाडेकरू ठेवलेला आहे. २०१२ पासून हे वर्कशॉप सुरू आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉपसाठी शेजारच्या घरातून वीज कनेक्शन घेण्यात आलेले आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत सा. बां. विभागाकडे लेखी तक्रारही केली होती, पण त्याची दखल घेण्यात आली नाही.

लेंबर कॉलनीतील हीच ती शासकीय निवासस्थाने. सुरुवातीला ज्यांच्या नावावर ही घरे देण्यात आली त्यातील बहुतांश लोकांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत.

यासंदर्भात आम्हीकार्यवाही करत आहोत. लवकरच संबंधितांवर कॉलनीमध्ये जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल. उमाकांतदांगट, विभागीयआयुक्त तथा अध्यक्ष, निवास वाटप समिती
बातम्या आणखी आहेत...