आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावित रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी जालनेकरांची समिती आवश्यक, खासदार दानवे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- गेल्या वर्षभरात जालन्याच्या विकासासाठी अनेक योजना मंजूर केल्या, पुढील काळातही विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,मात्र ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी जालनेकरांनी एक समिती स्थापन करावी, आवश्यक असेल तर कामावर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त अभियंता नियुक्त करु परंतु दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.

जालन्याच्या विकासाचे प्रश्न समजून घेण्यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून बेजो शीतल सीड्सच्या सभागृहात जालना विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार अर्जुन खोतकर,नारायण कुचे,भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी आमदार अरविंद चव्हाण,विलासराव खरात,िकशोर अग्रवाल,घनश्याम गोयल,ब्रम्हानंद चव्हाण,उद्योजक सुरेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती. परिषदेच्या सुरुवातीलाच उपस्थितांनी जालना शहर आणि जिल्ह्याच्या विकासासंदर्भात सूचना मांडल्या. यात प्रामुख्याने नवे उद्याेग,नागरी समस्या, बेरोजगारी आदी बाबतीत उपस्थितांनी उपाययोजना करण्याची मागणी केली तर उपस्थित अनेकांनी लेखी स्वरूपात सूचना मांडल्या. विकास कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत अनेकांनी सूचना केल्या, त्यावर खासदार दानवे यांनी जालनेकरांनी पुढे येण्याचे अवाहन केले. काही लोकांनी एकत्र येऊन समिती स्थापन करावी त्यामाध्यमातून होत असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवता येईल असे त्यांनी सांगितले. शिवाय जालन्याच्या विकासासाठी पुढील काळात निधी कमी पडू देणार नाही असेही खासदार दानवे यांनी याप्रसंगी सांगितले. सभागृह भरल्यामुळे बाहेर एलसीडी लावण्यात आला होता.

राजूर रस्त्याचे काम सुरू होणार
भोकरदन-राजूर रस्त्यासाठी ७२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामाला लवकरच प्रारंभ होईल.काम सुरू झाल्यानंतर वेगाने पूर्ण होण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी या वेळी सांगितले.

प्रत्येक सूचनेवर काम
जालनेकरांच्याप्रत्येक सूचनेचा विचार केला जाईल. त्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर केला जाईल. निकषात बसणारे प्रत्येक काम जिल्ह्यात खेचून आणले जाईल असे खासदार दानवे यांनी याप्रसंगी सांगितले. जनशताब्दी एक्स्प्रेस, जालना-भोकरदन रस्ता, शहरातील अंतर्गत जलवाहिनी आणि रस्त्यांसाठी निधी मंजूर केला. ड्राय पोर्टसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून उद‌्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे खासदार दानवे म्हणाले.

विकासासाठी उपयुक्त
जालनाशहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे. जालनेकरांनी मांडलेल्या या समस्या सोडविण्यासाठी आपणही प्रयत्न करू असे आमदार अर्जुन खोतकर यांनी याप्रसंगी सांगितले. आपल्या पाठपुराव्याने मोसंबी प्रक्रिया उद्योगासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आता शहरासाठी सिडको प्रकल्प आणि प्रस्तावित नागपूर-मुंबई चौपदरीकरण रस्ता जालना मार्गे होण्यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी या वेळी केली.

परिषदेत मांडलेल्या काही समस्या -सूचना
रमेशभाईपटेल: सावरकरचौकात वाहनांना शिस्त लावली जावी. अभयआबड: रिंगरोडवरील चौकांमध्ये लोकसहभागातून वाहतूक बेट विकसित करावेत.
सुनीलरायठठ्ठा: घाणेवाडीतलावातील गाळ शासनाने काढावा. सतीशपंच: शहरातसार्वजनिक स्वच्छतागृह असावेत. फेरोजअली: जालना-खामगावरेल्वे मार्गाचे काम सुरू व्हावे. अाशिषमंत्री: ड्रायपोर्टमध्ये कृषी माल निर्यात केंद्र असावे. विश्वजितखरात: शहरातवृक्षारोपण केले जावे. अंकुशरावदेशमुख: शहराचामास्टर प्लॅन तयार करावा. प्राचार्यरमेश अग्रवाल : विद्यापीठउपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. विनायकचिटणीस : शहराचेसोशल ऑडिट व्हावे. सुखदेवबजाज: फुलेमार्केटचे काम सुरू केले जावे. सगीरअहमद: झोपडपट्टीधारकांनापी.आर.कार्ड देण्यात यावे. रितेशमिश्रा : मेकइन इंडिया अंतर्गत जालन्यातही गुंतवणूक व्हावी गोविंदप्रसादमुंदडा : परदेशीगुंतवणूकदार जालन्यात येण्यासाठी प्रयत्न व्हावेत अॅड.सतीशतवरावाला : शहारातकचरा व्यवस्थापन व्हावे तसेच वाय-फाय सुविधा दिली जावी.
जालना विकास परिषदेत बोलताना खासदार रावसाहेब दानवे, व्यासपीठावर आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, रामेश्वर भांदरगे,किशोर अग्रवाल,धनश्याम गोयल आदी.