आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Municipal Corporation Tax In Aurangabad

कर वसुलीचे भूत मानगुटीवर, कर भरून घेण्यासाठी बँकांची मनधरणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिकेच्यावतीने स्मार्ट सिटीच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या ५० कोटी रुपयांसाठी मनपाच्या विकासासाठी जोरदार वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी चालू वर्षाचा कर जमा करण्यासाठी नागरिकांना देण्यात येणारे बिल तीन ते चार हजारांहून थेट २५ हजारांवर गेले असून वसुलीचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसत असल्याचे समोर आले आहे.

सध्या ५० कोटी रुपये उभे करण्यासाठी मनपा विशेष वसुली मोहीम राबवित आहे. कर्मचाऱ्यांसमोर वसुलीचा धाक उभा राहिला असून कर्मचारी, अधिकारी धाकापोटी नागरिकांना जास्तीचे बिल देत असल्याचे समोर आले. कांचनवाडी येथील रहिवासी सखाराम सरदार यांना २०१२ पासून २०१५ पर्यंत तीन ते चार हजार रुपयांचे बिल करापोटी येत होते. हे सगळे बिल जानेवारीनंतर देण्यात येत होते. यावर्षी २०१५-१६ चे बिल ऑगस्टच्या १० तारखेनंतर मिळाले. २५ हजार ३१४ रुपयांचे हे बिल आले. हे बिल बघून अगोदरच आजारी असलेले सरदार यांची प्रकृती बिघडली. त्यात त्यांचा पत्ताही चुकीचा देण्यात आल्याने मनपाच्या नोटिसीचा धाकच सरदार कुटुंबीयांनी घेतला आहे.

वसुलीचे शिवधनुष्य झनझन यांना पेलवेना
जुलैच्याशेवटच्या आठवड्यात स्मार्ट सिटीसाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत वसुली अधिकारी शिवाजी झनझन यांनी पंधरा दिवसांत ५० कोटी रुपये वसूल करू असे सांगितले होते. मात्र वसुलीबाबत १७ ऑगस्ट रोजी माहिती घेतली असता, केवळ पाच कोटी रुपये वसूल करण्यात झनझन यांना यश आले. मनपाने एप्रिलपासून आतापर्यंत २२ कोटी ३९ लाख रुपये वसूल केले आहेत.
बघून सांगू
^कर्मचाऱ्यांकडूनकाही चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त करता येतील. पण सगळे प्रकरण बघितल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही. संबंधितांनी अर्ज केल्यास प्रकरण कळेल. सी.एम. अभंग, वॉर्ड अधिकारी

सगळेच हैराण आहोत
दरवर्षीकर भरत असून त्याच्या पावत्याही माझ्याकडे आहेत. त्यानंतरही कर असल्याची नोटीस आली. तसेच पत्ताही चुकीचा असून यामुळे घरातील सर्व सदस्य हैराण झाले आहेत.
खारामसरदार, नागरिक कांचनवाडी

चुकिची पुनरावृत्ती
२०१४-१५या वर्षात सरदार यांचा दक्षिण विहार असा पत्ता आला होता. त्यावेळी त्यांनी कर भरून पत्ता दुरुस्ती करण्याचे पत्र दिले होते. त्यानंतरही आता त्यांच्या सेफ्रॉन हेरिटेजऐवजी घरापासून एक किमी दूर असलेल्या सुरूची रेसिडेन्सी, कांचनवाडी नावाने बिलाची नोटीस देण्यात आली.