आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ तासांत २४ गुन्हे दाखल तरीही पॉलिथीन पिशवीचा वापर सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ५०मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथीन पिशव्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाची एक जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी बंदी मोडणाऱ्या २४ व्यापाऱ्यांवर मनपाच्या पथकाने २४ तासांत गुन्हे दाखल केले. मात्र, काही भागात पॉलिथीन पिशव्यांचा धडाका सुरूच होता. तर अनेक हातगाडीचालक, महिला वर्गात जागरूकता दिसून आली. त्यांनी कापडी पिशव्यांचा वापर केला. दरम्यान, सायंकाळी प्लास्टिक विक्रेते व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौरांकडे धाव घेऊन आम्ही पॉलिथीन पिशवीविरोधी मोहिमेच्या बाजूनेच आहोत. पण ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या नावाखाली काही अधिकारी, कर्मचारी व्यापाऱ्यांचा छळ करीत आहेत. तो आधी थांबवा, अशी मागणी केली. २४ तासांत २४ गुन्हे दाखल तरीही पॉलिथीन...
अशी आहे शुक्रवारची कारवाई
शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी एक जानेवारीपासून पॉलिथीन पिशव्यांवर बंदी जाहीर केली. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रभाग कार्यालयनिहाय पथके स्थापन केली. या पथकांनी बाजारपेठांमध्ये तपासणी मोहीम राबवली. गेल्या आठ दिवसांपासून मनपातर्फे जागरूकता अभियानही सुरू आहे. त्याचा काहीसा परिणाम जाणवला.

तरीहीकारवाई : ५०मायक्रॉन म्हणजे नेमके काय, याची माहिती कारवाई करणाऱ्या पथकांना नाही. तरीही ते प्रत्येक व्यापाऱ्यावर कारवाई करत आहेत. एखाद्या दुकानातील पिशवी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मापक नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, औरंगाबाद प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश भुतडा, उपाध्यक्ष संजय गंगवाल , सचिव शेख नाजीम यांनी सायंकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला. तो मान्य करत शहानिशा करूनच कारवाई करण्याची सूचना तुपे यांनी केली. ते म्हणाले, ज्या व्यापाऱ्याकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, चहाचे कप किंवा पिण्याच्या पाण्याचे पाऊच आहेत, यांच्यावर अवश्य कारवाई करावी, पण ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या पिशव्या असणाऱ्या व्यापाऱ्यांचा छळ करण्यात येऊ नये.

एकक्विंटल पिशव्या जप्त, २४ जणांविरोधात गुन्हा :
दिवसभरातपालिकेच्या सहा वेगवेगळ्या पथकांनी केलेल्या कारवाईत २४ व्यापाऱ्यांविरोधात संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या. त्यांच्याकडून ९८ किलो १०० ग्रॅम वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्या तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. त्यात ५० टक्केपेक्षा अधिक ठोक विक्रेते आहेत.

अजून वेळ लागणारच
मनपाच्याइतिहासातप्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. त्याची प्रत्येक व्यापारी, नागरिकापर्यंत माहिती पोहोचण्यास वेळ लागेल. त्यामुळे मोहिमेला ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिसाद मिळण्यास वेळ लागणारच. अनेक लोक उत्स्फूर्तपणे कापडी पिशवीचा वापर करत आहेत, ही समाधानाची बाब आहे. प्रमोद राठोड, उपमहापौर
गुलमंडीवर बंदीचे सोयरसुतक नाही
मनपाआयुक्तांनी पॉलिथीन पिशवीवर बंदी जाहीर करत त्याच्या अंमलबजावणीसाठी पथके स्थापन केली. त्याचा नेमका किती परिणाम झाला. याची तपासणी "दिव्य मराठी'तर्फे करण्यात आली. शहराच्या विविध भागात "दिव्य मराठी'चे आठ रिपोर्टर फिरले. काही दुकानदार, हातगाडी चालकांशी संवाद साधला. तेव्हा पॉलिथीन बंदीचा निर्णय प्रत्येक व्यापाऱ्यापर्यंत पोहोचला नसल्याचे दिसून आले. किरकोळ साहित्य विक्रेते जागरूक असून काही बड्या विक्रेत्यांना बंदीशी देणेघेणे नसल्याचेही स्पष्ट झाले.
पुढईल स्लाइड्सवर पाहा, कुठे काय घडले...