आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त धान्यावर डल्ला,शे कडो टन धान्य गायब; आयुक्तांनी मागवला अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील १०४ गोदामांत तुटीखाली दाखवलेले शेकडो टन धान्य चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून विभागीय आयुक्तांनी त्या धान्याचे ऑडिट सादर करण्याचे आदेश पुरवठा विभाग व तहसीलदारांना दिले आहेत. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित ५ जबाबदार लोकांना गहाळ धान्याचे पैसे तत्काळ भरावेत, असे आदेश बजावले आहेत.

मराठवाड्यातील आठही जिल्हे औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या कक्षेत येतात. आठ जिल्ह्यांत १०४ गोदामे असून जिल्ह्याला प्रत्येकी सुमारे आठ ते दहा गोदामे वाट्याला येतात. या गाेदामांतून रेशन दुकानांना धान्य पुरवले जाते. आपत्कालीन परिस्थितीत अडचण होऊ नये म्हणून काही धान्य गोदामांत साठवले जाते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गोदामे धान्यांनी भरलेली असली तरी आठही जिल्ह्यांतील धान्याचे साठे तपासले असता यात मोठी तूट आढळली आहे. महापारेषणमध्ये वीजगळती दाखवण्याचा जो निकष आहे तोच धान्य तूट दाखवताना गृहीत धरला जातो. त्यासाठी १०% प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे. मात्र, ही तूट ३०% पेक्षाही जास्त असल्याने हे धान्य काळ्याबाजारात विकल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यामुळे सर्वच गोदामातील धान्याचे ऑडिट करून त्याचा लेखाजोखा विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी मागितला आहे.

जाधववाडीचे गोदामपाल अनिल नवाते यांना नोटीस बजावून ८९ हजार १०७ रुपये भरण्याचे आदेश दिले. विभागीय आयुक्तांनी औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर , बीड, जालना, उस्मानाबादच्या पुरवठा अधिकाऱ्यांना तुटीच्या धान्याप्रकरणी गोदामपालांसह तलाठ्यांना नोटीस बजावण्याचे तसेच ऑडिट करण्याचे अादेश दिले. सर्वच गोदामांची तपासणी होत आहे. त्याचा अहवाल कारवाई पूर्ण झाल्यावर येईल, असे पुरवठा उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी सांगितले.