आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Rewrite Answer Paper, Fore Arrest In Aurangabad

उत्तरपत्रिका पुनर्लेखनप्रकरणी आणखी चार जणांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बारावी उत्तरपत्रिका पुनर्लेखन प्रकरणात जालना पोलिसांनी मंगळवारी आणखी चार परीक्षकांना अटक केली. त्यातील तिघेजण जालना तर एकजण औरंगाबादचा रहिवासी आहे. गणेश आघाव, भारत जामने, ज्ञानोबा बिडवे या तिघांना जालना येथे तर मोतीराम राठोडला औरंगाबादेतून अटक करण्यात आली. पुनर्लेखनात या चौघांचा सहभाग असल्याचा संशय आहे. दरम्यान, या प्रकरणातील पहिला आरोपी श्रीमंत वाघ याने महाविद्यालयाचे बनावट प्रमाणपत्र जोडत उत्तरपत्रिका तपासणीसाठी घेतल्या होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
१८ मार्च रोजी जालन्यातील संस्कार निवासी वसतिगृहावर छापा टाकून पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले. पोलिसांनी २,८०० उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या. ४५० उत्तरपत्रिकांमध्ये आक्षेपार्ह लेखन आढळून आले. त्यांच्या हस्ताक्षर तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. उत्तरपत्रिका बाजारसावंगी येथील सद््गुरू कनिष्ठ महाविद्यालय, राणी उंचेगाव येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, पिशोर येथील सद्गुरू बालयोगी काशीगिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील तपासणीसाठी पाठवल्या होत्या. मुख्य आरोपी ज्ञानेश्वर सोनवणे अद्याप सापडलेला नाही. त्याच्या बाजारसावंगी, पिशोर येथील महाविद्यालयांना मंडळाने १,९०० उत्तरपत्रिका पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.