आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंडासह २२ कोटी भरल्यास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सेंटजोसेफ प्रशालेस ९९ वर्षे कराराने रेल्वे लाइन्स येथील जागा देण्यात आली होती. कराराची मुदत १९९५ मध्येच संपली. त्यानंतर संबंधित संस्थेने मुदतवाढ घेतली नाही. शिवाय, संस्थेने नवल पेट्रोल पंपासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेता जागा दिली. त्यामुळे कराराची मुदत संपल्यापासून ते जुलै २०१४ पर्यंतचा बिनशेती सारा त्यावर ४० पट दंड असे एकूण २२ कोटी रुपयांची दंडाची नोटीस पुना डायसोशन कार्पोरेशनचे सचिव रेव्ह. फादर माल्कम सिक्वेरा, सेंट जोसेफ प्रशालेचे मुख्याध्यापक भारत पेट्रोलियम कार्पोरेशन यांना बजावण्यात आली आहे.

संस्थेने हा करार ब्रिटिश सरकारच्या कालावधीत केला असून तो ९९ वर्षांसाठी नाही तर कायमस्वरूपी आहे आणि तशी कागदपत्रेही आमच्याकडे उपलब्ध आहेत, असा दावा संस्था सचिव माल्कम सिक्वेरा यांनी केला आहे.

त्यानंतर संस्थेने जिल्हाधिकारी यांच्याकडे कोणतेही म्हणणे सादर केले नाही. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी देऊनही संस्थेकडून कोणताही खुलासा सादर आल्याने २२ कोटी रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

दंडाची रक्कम जमा केल्यास मिळकतीवर तितक्या रकमेचा बोजा चढवण्यात येणार असल्याचे नोटिसीत नमूद केले आहे. या प्रकरणामध्ये संस्थेला शेवटची संधी म्हणून शर्तभंगाबाबत खुलासा सादर करण्याविषयी नोटीस दिली होती. या नोटिसीला उत्तर म्हणून संस्थेने १६ मार्च २०१५ रोजी जिल्हाधिकारी यांना म्हणणे सादर करण्यास एक महिन्याची मुदत मागितली होती.

९९ वर्षे नव्हे कायमची दिली आहे जमीन
ब्रिटिश सरकारने आमच्या संस्थेस शैक्षणिक धार्मिक प्रयोजनासाठी जमीन दिली होती. ही जमीन ९९ वर्षे करारावर दिली नसून ती कायमस्वरूपी दिली आहे. तसे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. याबाबत संस्थेकडून राज्य सरकार जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेली नोटीस चुकीची आहे. त्याबाबत आम्ही लवकरच राज्य शासन जिल्हाधिकारी यांच्याकडे म्हणणे मांडणार आहे. रेव्ह.फादर माल्कम सिक्वेरा, सचिव पुना डायसोशन कार्पोरेशन
काय आहे प्रकरण
शहरातीलसिटी सर्व्हे नं. ८३१० क्षेत्र २० हजार ६०० चौ.मी. ही सरकारी जागा संस्थेला १६ सप्टेंबर १८९६ रोजी ९९ वर्षे भाडेपट्ट्याने धार्मिक शैक्षणिक प्रयोजनासाठी दिली होती. याची मुदत नोव्हेंबर १९९५ रोजी संपली. या जागेपैकी १७ हजार ६२५ चाै.फूट जागा भारत पेट्रोलियम कंपनीस जिल्हाधिकारी यांची परवानगी घेता परस्पर २० वर्षे भाडेपट्ट्याने दिली आहे. शिवाय, नागपूरच्या महसूल लेखापरीक्षण विभागाने २१ फेब्रुवारी २००२ रोजी संस्थेकडून कोटी ३१ लाख ८९ हजार रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते.

धार्मिक आणि शैक्षणिक प्रयोजनासाठी सेंट जोसेफ प्रशालेला ब्रिटिश सरकारच्या काळात ९९ वर्षांच्या करारावर २० हजार चौरस मीटर जमीन देण्यात आली. परंतु, संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेता व्यावसायिक कारणासाठी पेट्रोल पंपाला जागा भाड्याने दिली. बाणाने दाखवलेल्या जागेत पेट्रोल पंप आहे.