आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issusing Order To Equal Water Distribution Implementation Still 25

‘समन्यायी पाणी वाटपासाठी 25 पर्यंत अध्यादेश काढा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समन्यायी पाणीवाटपाचे धोरण अवलंबवण्यासाठी गोदावरी खोर्‍यातील धरणांमधील पाण्याचे नियोजन महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा 2005 नुसार करण्यात यावे, त्याकरिता 24 एप्रिलपर्यंत अध्यादेश काढावा, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील मराठवाड्यातील सर्वपक्षीय 32 आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जायकवाडीच्या वरील धरणांतील पाण्याचे समन्यायी वाटप होणे गरजेचे आहे. पाणीवाटपासाठी अधिकार्‍यांच्या पदासह नियुक्ती करणारा अध्यादेश 24 एप्रिलपर्यंत जारी करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने मुख्यमंत्र्यांनी जायकवाडीत सुरुवातीला अडीच व नंतर नऊ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले.

पाणी वापराचे नियोजन 15 मेपर्यंत जाहीर केल्यास प्रत्येक धरणातील पाणी टक्केवारीनुसार वाटप करण्यास सुलभ होईल. मागील वीस वर्षांपासून पाणीवाटपाचे नियोजन बिघडल्याने अतिरिक्त पाणी वापरले गेले. यामुळे जायकवाडी भागात पाण्याचा अतिवापर झाला तर जायकवाडीखालील भाग हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिला, असे आमदार बंब यांनी म्हटले आहे.