आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बगळ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या मूकमोर्चा, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-रेल्वेस्टेशनपरिसरातील पार्किंगमध्ये करण्यात आलेल्या वृक्षतोडीत शेकडो पक्षी मृत्यू पावले असून तेवढेच जखमी झाले आहेत. या प्रकरणामुळे पक्षिमित्रांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. असा प्रकार पुन्हा कुणीही करू नये. यासाठी पक्षिमित्र सरसावले असून यातील दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यावरण आणि वनमंत्र्यांसह संबंधित विभागाकडेही करण्यात येणार आहे.
सोमवारी अवैधरीत्या करण्यात आलेल्या वृक्षतोडीमुळे अनेक पक्ष्यांचा जीव गेला आहे. त्यावर रेल्वे प्रशासनाकडून काहीच सांगण्यात आले नाही. हे प्रकरणच आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले. तर काही अधिकाऱ्यांनी आम्ही मनपाची परवानगी घेतल्याचा खुलासा केला. मात्र या
तिन्ही विभागांवर प्रश्नचिन्ह

वृक्षावरीलपक्ष्यांचा विचार कोणत्याही विभागाने केला नाही. यात वन विभाग, मनपा आणि रेल्वे प्रशासन या तिन्ही विभागांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी सुटी असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. मात्र यासाठी शहरातील सृष्टी संवर्धन समितीने पुढाकार घेतला आहे. समितीकडून दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन तयार केले आहे. बुधवारी त्यांच्या वतीने संबंधितांना निवेदने देण्यात येणार आहेत.

मोर्चा काढून श्रद्धांजली वाहणार
याप्रश्नावर "वुई फाउंडेशन' "ग्रीन औरंगाबाद फोरम'तर्फे गुरुवारी मूकमोर्चा काढून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. यासाठी शुभ्र कपडे परिधान करून सकाळी आठ वाजता रेल्वेेस्टेशनच्या ऑटो पार्किंग ते तोडलेल्या झाडापर्यंत मूकमोर्चा निघेल. तेथेच श्रद्धांजली सभा होईल. यात पक्षिमित्र, पर्यावरणप्रेमी संघटना, सामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माहितीसाठी मेघना बडजाते प्रीती शाह यांच्याशी संपर्क साधावा.