आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसमतमधील तीन व्यापाऱ्यांचे बँक खाते सील, नांदेडमधील व्यापारीही ITच्या संशयाच्या भोवऱ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्राप्तिकर विभागाने मराठवाडाभर  छापे टाकण्यास  सुरुवात केली असून सोमवारी(6 मार्च) रोजी वसमत येथील तीन व्यापाऱ्यांची बॅक खाती सील केली तर नांदेड मध्ये काही व्यापाऱ्यांचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांची सखोल चौकशी झाली मात्र यात अजून काळे धन बाहेर येण्यास काही दिवसांचा वेळ लागेल अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

1 मार्च पासून औरंगाबाद प्रधान आयकर कार्यालयाच्या वतीने काळेधन शोध मोहिम सुरु झाली आहे.संशयास्पद वाटणाऱ्या 18 लाख बँक खात्यांचा अभ्यास दिल्लीच्या मुख्यालयाने केला त्यातील संशयीत खाती विभागवार त्या-त्या विभागाच्या प्रधान आयकर आयुक्तांकडे पाठवण्यात आली.त्यानंतर 1 मार्च पासून ही मोहिम हाती घेतली गेली. पिहल्याच दिवशी औरंगाबाद,जालना,बीड येथून चार दिवसंात 13 कोटी रुपयांचे काळेधन प्राप्तिकर विभागाने हस्तगत केले.त्यापाठोपाठ सोमवारी 6 रोजी नांदेड विभागातील वसमत येथे तीन व्यापाऱ्यांच्या बॅक खात्यांवरील व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्याची खाती सील करुन ताब्यात घेतली आहेत.यात हळद व्यापारी, किराणा होलसेल व एक साखर व्यापारी यांचा समावेश आहे. 
 नांदेडमध्ये फक्त सर्व्हे...
 नांदेडमध्ये तीन कोटी रुपयांचे काळेधन पकडल्याची चर्चा सायंकाळी सात नंतर सुरु झाली त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे प्रधान आयकर आयुक्त व नांदेड येथील आयकर अधिकाऱ्यांना या बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, साडेतीन कोटी रुपये काळेधन पकडल्याचे वृत्त खरे नाही. काही व्यापाऱ्यांच्या व्यवहारांचा सर्व्हे मात्र सोमवारी झाला मात्र त्यातून अजून काळेधन हस्तगत झालेले नाही.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...