आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ITC Lab In Municipal Corporation School Aurangabad

मनपाच्या 78 शाळांत आयटीसी लॅब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपा शाळांतील मुलांना माहिती-तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान मिळावे यासाठी शहरात चार ठिकाणी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन अर्थात आयटीसी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार आहेत.

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शहरातील खासगी शाळांत प्रयोगशाळांची सुविधा आहे; पण मनपाच्या 78 शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनाही ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन अर्थात आयटीसी प्रयोगशाळा सुरू करण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतला. यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली; पण ते काम मार्गी लागले नव्हते. यासंदर्भात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले की, या प्रयोगशाळांसाठी 50 लाख रुपये खर्च येणार असून येत्या महिन्यात हे काम मार्गी लागणार आहे. प्रयोगशाळेचा विद्यार्थी लाभ घेतील, अशी अपेक्षा डॉ. कांबळे यांनी व्यक्त केली.