आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ITI Admissions Process,Latest News In Divya Marathi

‘आयटीआय’ प्रवेशाच्या प्रथम प्रवेश फेरीला प्रारंभ; दुस-या फेरीनंतरही निवडता येणार महाविद्यालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आयटीआयच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीला सोमवारपासून सुरुवात झाली. या फेरीत विद्यार्थ्यांना विषय तसेच महाविद्यालय निवडावे लागणार आहे. आतापर्यंत केवळ पहिल्या फेरीमध्येच ही सुविधा होती, परंतु यंदा आयटीआयने विद्यार्थी हितासाठी दुस-या फेरीनंतरही पर्याय निवडीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयातील जागा रिक्त राहिल्यास त्याची यादीही आयटीआयच्या वतीने प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य जी. बी. दंदे यांनी दिली.
आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकरिता राज्यभरात सोमवारपासून प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्‍ट अखेरपर्यंत चालणा-या या प्रक्रियेत 22 जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. विभागात असलेल्या 12 हजार जागांसाठी 30 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात मुलांच्या आयटीआयमध्ये 1 हजार 216 जागा आणि 28 ट्रेड आहेत. या जागांसाठी 2 हजार 842 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत, तर मुलींच्या 7 ट्रेडसाठी प्रत्येकी 26 जागांकरिता 300 ते 350 अर्ज आले आहेत.
विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांची पहिली फेरी 28 ते 31 जुलैपर्यंत राबवण्यात येत आहे. यात विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह हजर राहून प्रवेश निश्चित करायचे आहे. जे विद्यार्थी पहिल्या यादीत नाव असतानाही प्रवेश घेणार नाहीत त्यांना नंतर संधी मिळणार नाही, असेही आयटीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रवेशासाठी सहा फे-या होणार आहेत. सुरुवातीच्या दोनच फे-यांमध्ये जवळपास 90 टक्के प्रवेश निश्चित होतील, असे अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे, परंतु यंदा महाविद्यालयात जागा रिक्त राहिल्यास त्याची यादी दुस-या फेरीमध्येच आयटीआयच्या वतीने प्रसिद्ध केली जाणार आहे. या जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दुस-या फेरीत महाविद्यालय आणि ट्रेड निवडीची सुविधाही देण्यात आली आहे.

अशी होईल प्रवेश प्रक्रिया
28 ते 31 जुलै दरम्यान पहिली प्रवेश फेरी राबवण्यात येईल. त्यानंतर 1 ते 4 ऑगस्‍ट दरम्यान दुसरी फेरी पूर्ण होईल. यातून रिक्त राहिलेल्या जागांची यादी 5 ऑगस्‍ट रोजी जाहीर करण्यात येईल. या यादीनुसार विद्यार्थ्यांना पुन्हा 8 ऑगस्‍ट पर्यंत आपल्या आवडीचा ट्रÑेड आणि महाविद्यालय निवडण्याची संधी असेल. हे अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाइन करायचे आहेत. 10 ते 13 ऑगस्‍टपर्यंत या यादीचे प्रवेश निश्चित केले जातील. चौथ्या फेरीतील रिक्त जागांसाठी 14 एप्रिल रोजी निवड यादी जाहीर होईल. या फेरीतील प्रवेश निश्चिती 16 ते 19 ऑगस्‍टपर्यंत करता येतील. तसेच पाचवी फेरी 23 ते 27 ऑगस्‍ट आणि सहावी फेरी 29 ते 31 ऑगस्‍ट दरम्यान होणार आहे.