आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Its Possible Municipal Coporation Of Satara Waluj Pandharpur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा-वाळूज-पंढरपूर होऊ शकते संयुक्त महानगरपालिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाई स्वतंत्र नगर परिषद की महानगरपालिकेत समावेश अशी तळ्यात-मळ्यात परिस्थिती सध्या असतानाच विद्यमान सनदी अधिकारी तसेच अन्य वरिष्ठांनी याऐवजी सातारा-देवळाईसह वाळूज, पंढरपूर व बाजूच्या गावांना एकत्र करून स्वतंत्र महानगरपालिकाच स्थापन व्हावी, असा विचार मांडला आहे. शहराचा विकास हवा असेल तर हाच पर्याय असल्याचे या मंडळींनी स्पष्ट केले आहे.

डीएमआयसीला शोभेल असा शहराचा विकास करायचा असेल तर विकासाच्या मर्यादा असलेल्या नगर परिषदा तयार करण्यापेक्षा एकच महानगरपालिका असावी, असे सनदी अधिका-यांनी खासगीत बोलताना म्हटले आहे, तर निवृत्त सनदी अधिकारी कृष्णकांत भोगे यांनी तर महानगरपालिका झाली तरच नियोजनबद्ध विकास होऊ शकेल, असे म्हटले आहे. या मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनीही ही मागणी पुढे रेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
का म्हणतात अधिकारी?
सातारा-देवळाई नगर परिषद झाल्यानंतर येत्या काही दिवसांतच वाळूज-पंढरपूर व लगतच्या गावांची मिळून नगर परिषद व्हावी असा प्रयत्न सुरू होईल. कारण तशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू असून या परिसराची लोकसंख्या ७५ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे सातारा-देवळाईनंतर आणखी एक नगर परिषद अस्तित्वात येईल. त्यामुळे एकाच शहरात एक महानगरपालिका व लागूनच दोन नगर परिषदा असे चित्र शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य नाही.

कसा होईल फायदा?
सातारा-देवळाईपासून २० किलोमीटरचा परिसर एका महानगरपालिकेत येईल. औद्योगिक परिसर या नव्या महानगरपालिकेत येऊ शकेल. मालमत्ता करापोटी निधीही ब-यापैकी उभा राहू शकेल. विकास आराखडा एकत्र आखल्यास मोठे रस्तेही असू शकतील. पाण्यासाठी स्वतंत्र वाहिनी टाकणेही शक्य होईल किंवा औद्योगिक वसाहतीचे पाणी घेता येईल.

कोणत्या गावांचा समावेश होईल?
सातारा, देवळाई, वाळूज, पंढरपूर, रांजणगाव-शेणपुंजी, वडगाव-कोल्हाटी. तिसगाव, वळदगाव, पाटोदा या गावांचा समावेश केला जाऊ शकतो. कारण ही गावे दिसत असली तरी यांचा चेहरा शहरी झाला आहे. लोकसंख्या दीड लाखाच्या पुढे जाऊ शकते. त्यामुळे ड वर्ग मनपा निर्माण करणे शासनाला अवघड जाणार नाही.

पुढे वाचा नियोजनबद्ध विकास शक्य