आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण करून रेल्वे रुळावर ठेवले, शिर धडावेगळे होताच काढला पळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारहाण केली. तो बेशुद्ध झाल्यानंतर शांत डोक्याने त्यांनी फॉर्च्युनर गाडीत टाकून त्याला रुळावर झोपवले. रेल्वेगाडी येईपर्यंत घटनास्थळी गप्पा मारत बसले. रेल्वेगाडीने त्याचे मुंडके धडापासून वेगळे झाल्यानंतर पळ काढला. हा सगळा प्रकार आम्ही सर्जेराव चव्हाण याच्या सांगण्यावरून केला, अशी कबुली चंद्रकांत जाधव खूनप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींनी दिल्याची माहिती दौलताबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी सोमवारी दिली.

अशी घडली होती घटना...
1 जानेवारी रोजी वंजारवाडी शिवारातील महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या पाठीमागील रेल्वे रुळावर चंद्रकांत जाधव याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, १६ जानेवारीला मृताच्या पत्नीने सर्जेराव चव्हाण यानेच आपल्या पतीचा खून केला, अशी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. यातील प्रमुख संशयित आरोपी सर्जेराव चव्हाण (रा. करोडी) हा फरार असून मोबीन खान मकबूल खान पठाण ऊर्फ गुड्डू (२५, रा. आसेगाव, ता. गंगापूर), प्रभू नारायण बागूल (२३, रा. आसेगाव), बिरजू विठ्ठलाल तरैयेवाले (२२, रा. तिसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, डी. बी कोपनर, बी. के. पाचोळे, गौतम खंडागळे , राजेश पोहनकर, एस. बी काळे, ए. ए. सानप, बी. के. अकोलकर, पोपट दहिफळे, शिंदे, ज्ञानेश्वर साळवे यांनी केली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... कसा रचला कट आणि सविस्तर प्रकरण काय आहे...