आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडी जलाशयात पाच टक्के जिवंत साठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जायकवाडीत जिवंत पाणीसाठा पुनस्र्थापित करण्यासाठी कोणती कार्यवाही केली व करणार, अशा आशयाचे निवेदन खंडपीठात सादर करण्याचे निर्देश यापूर्वीच्या सुनावणीत दिल्याने गुरुवारी एक ऑगस्ट रोजी जलसंपदा विभागातर्फे पाच टक्के जिवंत साठा उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र जनता विकास परिषदेच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान राज्य शासनाने पाण्यासाठी काहीच कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आणले होते. खंडपीठाने शासनास विचारणा केली असता उत्तर देण्यासाठी मुदत मागून घेण्यात आली होती. आमदार प्रशांत बंब यांनी अ‍ॅड. अनिल बजाज यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करून 2004 नंतर जायकवाडीच्या वरील भागात एकही नवीन धरण बांधण्यास मान्यता देण्यात येऊ नये, असे आदेश असल्याचे निदर्शनास आणून दिले.