आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडीतून रब्बीसाठी पाणी, अगोदर कालव्याची दुरुस्ती; जालना- परभणीत मशिनरीही पाठवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या काही वर्षांपासून जायकवाडीतून पाणीच सोडण्यात आले नाही. खरिपासाठी जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय झाला; मात्र पावसामुळे पाणी सोडण्याची वेळ आली नाही. त्यामुळे आता रब्बीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे कालव्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी जालना- परभणी जिल्ह्यात मशिनरी पाठवण्यात आल्याची माहिती कडाचे प्रभारी अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे. जायकवाडीचा पैठणचा डावा कालवा २०८ किमीचा आहे. डावा कालवा जालना ते परभणी हे अंतर आहे, तर उजवा कालवा जायकवाडी ते माजलगाव १३२ किमीचा उजवा कालवा आहे. मात्र, रब्बीचे पाणी सोडण्याअगोदर कालव्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.
प्रत्येक विभागात कालव्याची दुरुस्ती जायकवाडीच्या कालव्यात पाणी सोडले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. त्यातच अनेक ठिकाणी कालव्याचे नुकसानदेखील झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे रब्बीचे पाणी सोडण्यापूर्वी ही दुरुस्ती करण्यात येत आहेत.

एकट्या परभणी जिल्ह्यात पंधरा एक्सव्हिटर्स त्याशिवाय लोडर्स, डोजर्स आणि इतर मशीनरी पाठवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कालव्यात मोठी झाडे तसेच मोठी भगदाडे पडली आहेत. त्यांची दुरुस्तीदेखील केली जाणार आहे. कडा विभागातल्या यांत्रिकी विभागाकडून ही कामे करण्यात येणार आहेत.

समिती घेणार पाणीपाळीचा निर्णय
जायकवाडी धरण सध्या ८२ टक्क्यापर्यंत गेले आहे. त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे किमान पाच पाणीपाळ्या मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. ही बैठक झाल्यानंतरच रब्बीच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...