आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडीकडे सहा हजार क्युसेक्स विसर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले / राहुरी - पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा, निळवंडेतून 10 ऑगस्टपासून सुरू असलेले पाणी सोमवारी जायकवाडी धरणात पोहोचले. भंडारदरातून अतिरिक्त पाणी 3,268 क्युसेक्सने निळवंडे धरणात जात आहे, तर निळवंडेतून 6,254 क्युसेक्सने पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत आहे. सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात सध्या 19 हजार 816 दशलक्ष घनफूट (76 टक्के) पाणीसाठा आहे. धरणात पाण्याची 2247 क्युसेक्सने आवक सुरू आहे.

11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात मंगळवारी 10,599 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. निळवंडे धरणात 5212 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. धरणाच्या सांडव्यावरून 6254 क्युसेक्सने प्रवरा नदीत विसर्ग सुरू आहे. 1 जून ते 12 ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाने 4 हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला.

जायकवाडीत 17.2 टक्के साठा :
नगर व नाशिक जिल्ह्यांत चांगला पाऊस होत असल्याने या भागातील धरणांतून 9500 क्युसेक्स वेगाने पाणी जायकवाडीच्या दिशेने येत असून मंगळवारी या धरणातील पाणीसाठा 17.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. येत्या चार दिवसांत या साठय़ात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.