आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jaikwadi Water Issue Is Wrong Says Radhakrishna Vikhe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडी धरणावरून प्रादेशिक वाद चुकीचा- कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कृष्णा खोर्‍यातील धरणातून पाणी उचलून न्यावे लागते. त्यामुळे ही धरणे नावालाच आहेत. येथील पाणी जायकवाडीकडे वळवणे आवश्यक आहे. तसेच जायकवाडीच्या पाण्यावरून अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद असा प्रादेशिक वाद करणे चुकीचे असल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

कोरडवाहू शेती अभियान कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शनिवारी (24 ऑगस्ट) ते शहरात आले होते. जायकवाडीत पाणी नाही. नाशिक, नगरकडील राजकीय व्यक्ती पाणी सोडण्यासाठी राजकारण करत आहेत. अशा परिस्थितीत येथील कोरडवाहू शेतीचा विकास कसा साध्य होणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, पर्जन्यमान कमी होत असल्याने नदीनाल्यांना पूर येत नाही. मग जलसाठय़ात पाणी क ोठून येणार? औरंगाबादप्रमाणे नगर, नाशिकची स्थिती आहे. तेव्हा जायकवाडी धरणात पुरेसा जलसाठा व्हावा यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करून प्रश्न सुटणार नाही. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी पाणी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात येणार आहे. कोकणात पर्जन्यमान चांगले आहे. तेथील धरणात भरपूर पाणी आहे. वैतरणा धरणातून जायकवाडीत 12 टीएमसी पाणी येऊ शकते. कृष्णा खोर्‍यातून उचलून पाणी न्यावे लागते. त्याऐवजी थोडा खर्च केला तर हे पाणी इकडे वळवून कायमचा तोडगा निघू शकतो. काही लोक मुद्दाम खोडा घालून भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात गुंतून ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. यास जलसंपदा विभाग जबाबदार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.

18 टक्केच सिंचन क्षेत्र

4पाऊस हुलकावणी देतो, दगा देत नाही. दरवर्षी मान्सूनमध्ये हेक्टरी 20 लाख लिटर पाऊस पडतो, पण जलसंवर्धनासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. पाण्याच्या प्रश्नावरून अंतर्गत वाद करून चालणार नाही. सिंचनासाठी 80 हजार कोटी रुपये खर्च केला आहे आणि राज्यात केवळ 18 टक्केच सिंचन क्षेत्र आहे. तेव्हा मातीने पाणी आडते, वनाच्छादित क्षेत्रात वाढ करणे आवश्यक आहे. प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ.