आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jain Community Nominal Interest Rate Of Loans To Students

जैन समाजातील विद्यार्थ्यांना अत्यल्प व्याजदराने कर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-केंद्रस्तरावर जैन समाजाला सहावा अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अत्यल्प व्याजदराने कर्ज मिळणार आहे, अशी माहिती गुरुवारी (23 जानेवारी) चंद्रसागर धर्मशाळा येथे झालेल्या आभार मेळाव्यात देण्यात आली. यापुढील काळात जैन समाजाच्या शैक्षणिक संस्था मोठय़ा प्रमाणावर सुरू करणे सहज शक्य होणार आहे. त्यात समाजाच्या मुलांना 50 टक्के आरक्षण राहणार आहे, असेही सांगण्यात आले.

शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळाल्याने काय फायदे होणार याची माहिती दिली. ते म्हणाले की, शाळांमध्ये जैन धर्माची नैतिक शिकवण देता येणार आहे. समाजाची धार्मिक संस्थाने आता सरकारला अधिग्रहित करता येणार नाहीत. धार्मिक संस्थांना तेथील भाडेकरू काढून टाकण्याचा अधिकार मिळाला आहे. मुलांना केंद्राची शैक्षणिक शिष्यवृत्ती घेता येईल. व्यवसाय तसेच शिक्षणासाठी अत्यल्प व्याजदरावर कर्ज उपलब्ध होईल. जैनांना अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याने आपल्या अधिकार, सवलतींवर गदा येणार, अशी भावना अनेक समाजांमध्ये निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात बौद्ध, खिश्चन, मुस्लिम, शीख आणि पारसी धर्मांना मिळणार्‍या सवलती, योजनांमध्ये कुठलीही कपात होणार नसून निधी वाढवून देण्यात येणार आहे. दर्जा मिळाल्यानंतर अल्पसंख्याक म्हणून भांडू नका, आक्रमक होऊ नका, असेही ते म्हणाले.

या वेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरक, महावीर पाटणी, देवेंद्र काला, जैनम महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा भारती बागरेचा, अध्यक्षा डॉ. निर्मला मुथा, कविता अजमेरा, हेमलता मुगदिया, भाजपचे प्रशांत देसरडा यांची उपस्थिती होती.

भाजपलाही श्रेय

या सोहळ्यात सर्वच मान्यवर राजेंद्र दर्डा यांनी समाजाच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगत होते. त्यावर भाजपचे माजी उपमहापौर प्रशांत देसरडा म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा झाली आहे. त्याचे र्शेय जसे काँग्रेसला तसेच भाजपलाही आहे. विरोधकांच्या सर्मथनामुळेच सरकार हा निर्णय घेऊ शकले, हे विसरू नका.

आपची धास्ती

सकल जैन समाजाचे सचिव महावीर पाटणी त्यांच्या भाषणात सातत्याने ‘आप’ हमेशा समाजाचे हित मे कार्य करते आये है, ‘आप’से हमे और भी बहुत अपेक्षाए है असे म्हणत होते. तेव्हा देसरडा, दर्डा यांनी हस्तक्षेप केला. पाटणी म्हणत असलेले ‘आप’ हे पक्षाचे नाव नसून सर्वांना आदरार्थी संबोधन आहे, असे स्पष्ट केले.