आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जैन साध्वी प्रभाकंवरजी यांचे औरंगाबादेत निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जैन साध्वी प्रभाकंवरजी महाराजसा (८७) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी दुपारी एक वाजता निधन झाले. डिसेंबरपासून प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्या महावीर भवनात वास्तव्यास होत्या. जीवनाला दिशा देणारे प्रभावी मार्गदर्शन त्या आपल्या अमोघ वाणीतून करत असत. यापूर्वी ५० वेळा त्यांनी औरंगाबादेत वास्तव्य केले आहेे. चिकलठाणा येथील गोशाळेमध्ये त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महावीर भवनातून सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

जालना जिल्ह्यातील डोंगर सेवली या गावी २ ऑगस्ट १९२७ ला श्रीचंद बेदमुथा यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी जालना येथे गुरुगणेशलाल महाराजसा यांच्याकडून दीक्षा घेतली होती. त्या बालब्रह्मचारी होत्या. १८ भाषा अवगत होत्या. एम. ए. हिंदी आणि एम. ए. इंग्रजी असे त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. ज्ञानगंगोत्री नावाने त्यांना संबोधण्यात येत होते.
त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्यामुळे २००१ मध्ये त्यांना महाराष्ट्र प्रवर्तिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना विदर्भ सिंहिणी पुरस्कारही मिळाला होता.

झालेल्या आहेत. ज्ञान गंगोत्री नावाने त्यांना संबोधण्यात येत होते. त्यांच्या ३६ शिष्या आहेत. चातुर्मासानिमित्त १६ जणींचा मेळा त्यांच्यासोबत वास्तव्यास होता. महावीर भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.