आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वस्थ इच्छुकांना जैस्वालांमुळे दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युती होणार की नाही, उमेदवारी कोणाला मिळते या कारणांमुळे शिवसेनेचे इच्छुक अस्वस्थ असतानाच सर्व स्थानिक नेते मुंबईला गेले. युतीच्या जागावाटपाचे काय चालले हेही कोणाला समजत नव्हते. त्यामुळे ही मंडळी आणखीनच अस्वस्थ झाली. मात्र, मुंबईहून बुधवार व गुरुवारी महानगरप्रमुख, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी पक्षाच्या समर्थनगर येथील प्रचार कार्यालयात तळ ठोकला. भेटीस आलेल्या प्रत्येकाशी ते बोलले. दोन दिवसांत यातून मार्ग निघेल, असा दिलासा दिल्याने इच्छुकांची अस्वस्थता कमी झाली. जैस्वाल यांनी आणाखी दोन दिवस थांबा. मतदारांना भेटणे सुरू ठेवा, असा सल्ला दिला.

अन् गप्पांचे फड रंगले
चौकशीसाठी येणा-या इच्छुकांना त्यांनी दिलासा दिला. त्यामुळे कार्यालयात पुन्हा कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. जागावाटप ५ एप्रिलपर्यंत होईल. पण तोपर्यंत करायचे काय, याचे उत्तर कार्यकर्त्यांना मिळाले अन् प्रचार कार्यालयात गप्पांचे फड रंगले. दुपारच्या सत्रात खा. खैरेही कार्यालयात आले होते.
पुढे वाचा... सोळा तास पाणी देऊ