औरंगाबाद - भारतीय जलसंस्कृती मंडळ आणि एमआयटी महाविद्यालयाच्या वतीने 13 व 14 मार्चला नववे जलसाहित्य संमेलन होणार आहे. महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम होईल. गुरुवारी सकाळी 10 वाजता कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर असतील.
कार्यक्रमात साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे, बी. बी. ठोंबरे, प्रा. दासू वैद्य आदींच्या अध्यक्षतेखाली विविध परिसंवाद होतील. 14 रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ. विश्वास येवले यांची प्रकट मुलाखत होईल. या वेळी जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, डॉ. रा. श्री. मोरवंचीकर, डॉ. दि. मा. मोरे, डॉ. दत्ता देशकर, अरुणा सबाणे यांची उपस्थिती राहणार आहे, तर मुनीश शर्मा संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असतील. समारोप यशवंतराव गडाख यांच्या हस्ते होईल, उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. दत्ता देशकर, डॉ.अशोक तेजनकर, डॉ. एस. टी. सांगळे, डॉ. क्षमा खोब्रागडे, रमेश पांडव, लक्ष्मीकांत धोंड यांनी केले आहे.