आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना-खामगाव रेल्वेमार्ग १०६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर,जालनेकरांकडून स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- जालना-खामगाव रेल्वेमार्गाच्या कामाला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेची १०६ वर्षाची मागणी अखेर मंजूर झाली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे. हा मार्ग साकार झाल्यानंतर बुलडाणा आणि जालना या मागा जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहेच शिवाय विदर्भ पंढरी शेगाव आणि पंढरपूर हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नानेच हा मार्ग मंजूर झाल्याने रेल्वे संघर्ष समितीने फटाके फोडून जल्लोष केला तसेच खासदार रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन केले आहे.

भौगोलिकदृष्ट्या जालना शहर हे अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. येथून मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी मार्ग आहेत. येथील भुसार माल, स्टील उद्योग यांचे महत्त्व लक्षात घेता जालना रेल्वेमार्गाने विदर्भाला जोडणे आवश्यक होते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून जालना-खामगाव मार्गासाठी रेल्वे संघर्ष समिती, उत्तर भारतीय संघ, मराठवाडा जनता विकास परिषद आणि या दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आहे. दरम्यान गुरुवारी अर्थसंकल्पात या मार्गासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने रेल्वेस्थानक तसेच मामा चौक येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी समितीचे गणेशलाल चौधरी,फेरोज अली,सुभाष देवीदान, रमेश तवरावाला,विनीत सहानी,संतोष गाजरे, शीतल तनपुरे,बाबूराव सतकर आदींची उपस्थिती होती. संघर्ष समितीकडून लवकरच रेल्वेच्या आकारातील ७८ किलोचा केक खासदार दानवे आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कापण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले.
प्रस्तावित मार्गावर अजूनही मातीचे भराव
जालना-खामगाव मार्गावरअजूनही काही ठिकाणी रेल्वे रूळ टाकण्यासाठी तयार केलेले मातीचे भराव दिसून येतात तर काही ठिकाणी रेल्वे रुळाचे साहित्य टाकण्यात आले होते.
ब्रिटिशांनीसुरूकेलेल्या या मार्गाचे काम तेव्हा चार वर्षातच बंद पडले होते. आता हे काम पुन्हा सुरू होणार असल्याने या मार्गावरील गावांमध्येही आनंद व्यक्त केला जात आहे.
किंमत वाढली
२००२मध्ये या कामाचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने त्यासाठी हजार २६ कोटी रुपये मंजूर केले होते.मात्र त्यानंतर रेल्वेने याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे हे काम सुरू झाले नव्हते. सर्वेक्षणानंतर पुन्हा जवळपास १३ वर्षे विलंब झाल्याने प्रकल्पाची किंमत वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुसरा मोठा प्रकल्प
गेल्यावर्षभरात जालना येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने ड्राय पोर्ट मंजूर झाला त्याचे भूमिपूजनही झाले. त्यापाठोपाठ आता तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करून या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याने या भागाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. त्यामुळे जालना आता विकासाच्या ट्रॅकवर येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

१९१० मध्ये आला प्रस्ताव
खान्देशआणिविदर्भ,मराठवाड्यातील कापूस इतर कच्चा माल जालना स्थानकाहून थेट इंग्लंडला घेऊन जाता यावा यासाठी ब्रिटिश सरकारने १९१० च्या सुमारास जालना-खामगाव असा रेल्वेमार्ग प्रस्तावित केला होता.

१९२९मध्येया मार्गाचे काम सुरू झाले. सेंट पेनेन्झुला कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. चार वर्षे काम चालले मात्र दरम्यानच्या काळात दुसरे महायुद्ध सुुरू झाले त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढा सुरू झाला त्यामुळे ब्रिटिशांनी हे काम अर्धवट सोडले.

दीर्घ मागणीला न्याय मिळाला
जालना-खामगावरेल्वेमार्ग व्हावा ही येथील जनतेची अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्यासाठी लोकसभेत अनेकवेळा प्रश्न मांडले, मात्र तेव्हाच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आता या मार्गाला मंजुरी मिळाल्याने या भागाच्या विकासासाठी हा मार्ग उपयुक्त ठरेल. रावसाहेब दानवे,खासदार जालना

जालना होईल निर्यातीचे केंद्र
सीडकॅपिटल आणि स्टील सिटी अशी ओळख असणाऱ्या या जालना शहरात काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सीड पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावजवळ एका खासगी कंपनीचा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू होत आहे. तर जालना येथे देशातील पहिला ड्राय पोर्ट उभारला जात असल्याने पुढील काळात जालना हे राज्यातील मोठे निर्यात केंद्र म्हणून पुढे येऊ शकते.

विदर्भ आणि महाराष्ट्र पंढरी रेल्वे ट्रॅकवर
यामार्गामुळे जसा व्यापार आणि उद्योगाला लाभ होणार आहे त्याचप्रमाणे विदर्भाची पंढरी शेगाव आणि महाराष्ट्राची पंढरी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र थेट रेल्वे ट्रॅकने जोडली जाणार आहेत. हा मार्ग भाविकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शिवाय खामगाव मध्य रेल्वेला जोडलेले आहे तर जालना दक्षिण मध्य रेल्वेला जोडलेले आहे. त्यामुळे जालना-खामगाव मार्गासाठी रेल्वेच्या या दोन्ही विभागांना एकत्रित काम करावे लागणार आहे.