आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam Issue Gulabrao Devkar Bail Reject For Aurangabad High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव घरकुल प्रकरण: गुलाबराव देवकरांचा जामीन रद्द, अटकेचे निर्देश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी आणि परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचा जामीन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी रद्द केला. त्यामुळे देवकरांना अटक करण्याचेही शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात देवकरांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे, पक्ष देवकरांच्या पाठीशी असल्याचे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी सांगितले आहे.
जळगाव घरकूल घोटाळ्यातील आरोपी देवकर 21 मे रोजी पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. त्यानंतर जळगाव जिल्हा न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. परंतु या जामिनाला प्रेमानंद बन्सी जाधव यांनी एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते.
या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. न्या.नलावडे यांनी निकाल देतांना देवकरांचा जामीन रद्द केला. तसेच त्यांना तात्काळ अटक करण्‍याचे आदेशही दिले आहे.
जळगावमधील घरकुल घोटाळ्यातील आरोपी असलेले गुलाबराव देवकरांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जळगाव जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
देवकर हे घरकुल घोटाळ्यातले प्रमुख आरोपी असून तत्कालीन नगराध्यही आहेत. 29 कोटी 59 लाख रुपयांच्या या घोटाळ्यात अटक झालेले दुसरे मोठे दिग्गज आहेत. जळगावचे आमदार सुरेश जैन हे देखील अटकेत आहेत.
घरकुल घोटाळा : आमदार सुरेश जैन न्यायालयीन कोठडीत
जळगाव घरकुल घोटाळा: पाचही नगरसेवकांचा जामीन नामंजूर
घरकुल घोटाळा: मयूर, वाणींची सुनावणी लांबली