आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशमन दलातील जवानाच्या मृत्यूनंतर लोक रस्त्यावर, संतप्त जमावानेच काढले अतिक्रमण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -अग्निशमन दलातील जवानाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मांसविक्रेत्यांच्या टपर्‍या शनिवारी संतप्त जमावाने उचलून फेकल्या. महापालिकेच्या पथकानेही दखल घेत या रस्त्यावरील अतिक्रमण काढले. दरम्यान, टपरीधारक आणि बंदोबस्तावरील पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.

काही वर्षांपासून जळगाव रोडवरील एसबीओ शाळेजवळ मांसविक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. अरुंद रस्त्याच्याकडेला मांसविक्रेत्यांच्या टपर्‍या असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी शुक्रवारी याच रस्त्यावर अग्निशमन दलाचे कर्मचारी अनिलकुमार मगरे अपघातात ठार झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाला येथील अतिक्रमण काढण्यासाठी तगदा लावला. शनिवारी सकाळी महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अतिक्रमण काढले.

काय म्हणतो कायदा ?
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनयम 1949 नुसार विनापरवाना व्यवसाय करणार्‍या विरोधात दंडात्मक कारवाई करता येते. तसेच कुठलाही व्यवसाय करण्यापूर्वी नगररचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मांसविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, पण या एक वेल्डिंग तर तीन मांसविक्रीच्या टपरीधारकांनी कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. दोन वर्षांपासून ते विनापरवाना व्यवसाय करत होते.