आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडतर्फीपासून पगार देण्याचे जालना जिल्हा बँकेस खंडपीठाचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बडतर्फ कर्मचार्‍यांना बडतर्फी आदेशापासून पूर्ण पगार देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी दिले आहेत.
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी रमेश घुमारे, सुभाष दाभाडे व उमेश कवडे तिघांना बँक प्रशासनाने गैरवर्तन केल्याबद्दल बडतर्फ केले होते. बँकेवर प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त झाल्यानंतर फेरचौकशी करून कर्मचार्‍यांना तडजोडीअंती पूर्ववत कामावर घेतले होते. नंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने त्या तीन कर्मचार्‍यांना पुन्हा बडतर्फ केले होते. कर्मचार्‍यांनी संचालक मंडळाच्या निर्णयास जालना कामगार न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने कर्मचार्‍यांना सेवासातत्य बहाल करून मागील पगार देण्याचा आदेश दिला होता. बँकेने उपरोक्त आदेशाचे पालन न करता कामगार न्यायालयात रिव्हिजन दाखल केले. न्यायालयाने बँकेचे तीनही रिव्हिजन पिटीशन अंशत: मंजूर करून कर्मचार्‍यांना केवळ 50 टक्के मागील पगार देऊन रुजू करून घेण्याचे आदेश दिले. बँकेने खंडपीठात तीन स्वतंत्र रिट याचिका दाखल करून आव्हान दिले. तिन्ही कर्मचार्‍यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने बँकेच्या याचिका खारीज केल्या. कर्मचार्‍यांच्या याचिका मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिले. कर्मचार्‍यांच्या वतीने अ‍ॅड. पी. एम. शिंदे यांनी बाजू मांडली.