आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना रोडच्या रुंदीकरणात सात इमारतींची साडेसाती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - साडेचारशे कोटी रुपये खर्चून केंब्रीज ते नगर नाका या चौदा कि.मी.च्या जालना रोडच्या विस्तारीकरणासाठी महापालिकेने रस्त्याच्या डिमार्केशनचे काम पूर्ण केले असून अहवालही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे. या रस्त्यावर चिकलठाणा, मोंढा नाका, सिंधी कॉलनी भागातील सुमारे इमारती सोडल्या तर नव्वद टक्के रस्ता मोकळा झाल्याचा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला आहे. नोव्हेंबर महिन्यात रस्त्याच्या कामाचे टेंडर निघून फेब्रुवारी, मार्चमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जालना रोडच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी ४५० कोटी रुपये मंजूर करून वर्ष उलटले तरी या कामाला सुरुवात झाली नाही. टीडीआर की रोख मोबदला अशा संभ्रमात मनपाचे अधिकारी होते. त्यामुळे मालमत्तांचा मोबदला देताना अनेक अडचणी होत्या. शेवटी टीडीआरचाच पर्याय केंद्र शासनाने दिल्याने मनपाने महिनाभरात या १४ कि.मी. रस्त्याचे डिमार्केशन पूर्ण केले ९० टक्के रस्ता ४५ मीटरचा केल्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला(एन.एच.आय.) मनपाने दिला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर हे काम सुरू करू, असा निर्वाळा एनएचआयचे प्रकल्प संचालक
यू.जे.चामरगोरे यांनी दिला.

^ आम्ही जालना रोडचे डिमार्केशन पूर्ण केले आहे. आता चिकलठाणा,सिंधी कॉलनी मोंढा नाका येथील किरकोळ बॉटल नेकचा भाग मोकळा करून द्यायचा आहे. ते काम सुरू असतानाही करता येईल. आम्ही नव्वद टक्के काम पूर्ण केल्याने रस्त्याचेकाम रखडणार नाही. -ए.बी.कुलकर्णी,उपअभियंता, मनपा
^पंतप्रधान नरेंद्रमोदींकडून देशभरातील रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुले जालना रोडचे काम दिवाळी दरम्यानच सुरू होईल असे वाटते. हा रस्ता झाला तर जेथे दीड तास लागतो तोच रस्ता पार करताना फक्त पंधरा मिनिटे लागतील. चंद्रकांतखैरे, खासदार

^मनपाने डिमार्केशनपूर्ण केले आहे. आता खूप कमी इमारतींचा अडथळा आहे. तोही काही दिवसांत मनपा दूर करेल. महिनाभरात रस्ता चौदा मीटरचा होईल. दिवाळीनंतर टेंडर निघेल. आमची तयारी झाली आहे. आैट्रम घाटाचेही काम जानेवारीत सुरू होईल. -यू.जे.चामरगोरे,प्रकल्प संचालक

या रस्त्याच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्याच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी निधी पांडे आहेत. त्यांना दर महिन्यात प्रगतीचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यांनी देखील एनएचआयचे संचालक चामरगोरे यांना काही सूचना केल्या. रेल्वे, बीएसएनएलसह सा.बां. विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन या रस्त्याबाबत सूचना मागवल्या. कारण आता या १४ किमीवर कोणतेही खोदकाम केले जाणार नाही. पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार करूनच हा रस्ता तयार केला जाणार आहे. शिवाय वरील बाजूने मेट्रो धावण्याची व्यवस्थाही केली आहे.

बोगद्याचे काम लांबले...
कन्नडच्या औट्रम घाटातील ११ किमीच्या बोगद्याचे काम जानेवारीपर्यंत लांबले आहे. या घाटातील खडकांच्या शास्त्रीय तपासणीचा अहवाल बाकी आहे. या घाटाच्या एरियल शूटिंगसह पीपीटी पूर्ण झाले आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे हा नकाशाही बदलावा लागला. दीड किलोमीटरने बोगद्याची लांबी वाढवावी लागल्याने हे काम जानेवारी २०१७ पासून सुरू होणार असल्याचे एनएचआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्लीत प्रेझेन्टेशन
केंद्रीय भूपृष्ठ जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर जालना रोडच्या नव्या आराखड्याचे पीपीटीद्वारे सादरीकरण झाले आहे. यात हा रस्ता ४५ मीटर रुंदीचाच असून त्यावर फूटब्रीज, ओव्हर ब्रीज असतील. भुयारी मार्गाची, गॅसपाइपलाइनची रचना कशी असेल याचेही सादरीकरण झाले. या रस्त्याचे शूटिंग ड्राेनद्वारे करण्यात आले असून तेही स्लाइड शोमध्ये समाविष्ट केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...