आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना रोड सहापदरी; प्रस्ताव मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील हमरस्ता जालना रोडच्या नूतनीकरणासाठी बांधकाम विभागाने 20 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव जून 2012मध्ये शासनाकडे पाठवला होता. तीन टप्प्यांच्या या कामातील पहिल्या टप्प्याला मंजुरी देत शासनाने निधीही दिला आहे. नगर नाका ते बाबा पेट्रोलपंप, पंचवटीपर्यंत रस्ता नूतनीकरण काम फेब्रुवारीत सुरू होईल.

दै. ‘दिव्य मराठी’ने 18 जुलै 2012 रोजी ‘जालना रोड सहापदरी’ या मथळ्याखाली याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. बांधकाम खात्याच्या आराखड्यात नगर नाका ते बाबा असा 2 कि.मी.चा रस्ता चारपदरी, क्रांतीचौक ते सिडको बसस्टँड चौक हा 4 कि.मी.चा रस्ता सहापदरी, तर सिडको ते चिकलठाणा हा 3.8 कि.मी.चा रस्ता चारपदरी करण्याचा प्रस्ताव होता. त्यातील पहिल्या टप्प्यास मंजुरी देत शासनाने सुमारे 4 कोटी रुपयेही दिले आहेत. यामुळे निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय मान्यतेनंतर फेब्रुवारीमध्ये हे काम हाती घेण्यात येईल. दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्याच्या कामाच्या प्रस्तावाची येत्या बजेट मध्ये तरतूद करण्यात आल्याने मार्चनंतर हेदेखील काम सुरू केले जाणार आहे. नवीन आराखड्यानुसार जालना रोडचा कायापालट होणार आहे.

शासनाकडून निधी उपलब्ध...
जालना रोडच्या विकास आराखड्याच्या नवीन प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सुमारे पावणेचार कोटींचा निधीही आला आहे. क्रांती चौक ते सिडको आणि सिडको ते चिकलठाणा ही दोन कामे मार्चपर्यंत मंजूर होऊन लवकरच काम सुरू केले जाईल.
हेमंत पगारे, अधीक्षक अभियंता, सा.बां. विभाग