आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थाचालकाने केला शिक्षकाचा खून, भावाची पोलिसांत तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षक दत्तात्रय माधवराव पोकळे - Divya Marathi
शिक्षक दत्तात्रय माधवराव पोकळे
औरंगाबाद - जालन्यातील शिंदे वडगाव येथील ४३ वर्षीय शिक्षक दत्तात्रय माधवराव पोकळे यांचा खून संस्थाचालक आत्माराम रायभानजी तिडके (६०), अमोल आत्माराम तिडके (३० रा. पानेवाडी, ता. घनसावंगी) यांनीच केल्याची फिर्याद मयताचे भाऊ गुलाबराव माधवराव पोकळे (४६) यांनी रेल्वे पोलिसांकडे नोंदवली आहे. त्यानुसार या दोघांना ताब्यात घेण्यासाठी रेल्वे पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळी घनसावंगीकडे रवाना झाले. 
 
बुधवारी सकाळी रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर दत्तात्रय पोकळे यांचा मृतदेह आढळला होता. दगड फरशीने चेहरा ठेचून अॅसिड टाकून जाळण्यात आला होता. मात्र त्यांच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली. दत्तात्रय यांच्या भावाने संशयित म्हणून ते ज्या शाळेत शिक्षक होते, त्या संस्थेच्या सचिवाचे नाव दिले आहे. 
 
सहायक पोलिस निरीक्षक भगवान कांबळे आणि त्याचे पथक पानेवाडीसह आजूबाजूला असलेल्या गावांत त्यांचा तपास करत आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत हे दोघे संशयित पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे दत्तात्रय यांचा खून नेमका कोणी आणि का केला हे रहस्य उलगडले नाही. घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयात दहा वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. 
 
दरम्यान, संस्थेला अनुदान मिळाल्यानंतर पोकळे यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या निर्णयाविरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने दत्तात्रय यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही संस्थाचालकांनी त्यांना रुजू करून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी न्यायालयाकडून त्यांना रुजू करून घेण्याविषयी पत्र मिळणार होते, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...