आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार योजनेची १२९६ कामे प्रगतिपथावार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली ४१२२ कामे पूर्ण झाली असून उर्वरित १२९६ कामे मार्चअखेर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात १३०२ कामे प्रगतिपथावार होती. त्यापैकी सहा पूर्ण झाली अाहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २२८ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत एकूण ५४०० कामे करण्याचे उदिष्ट असून यापैकी ४१२२ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार योजनेतील कामांत सातत्य नसल्याने उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी फक्त काही दिवसांचा अवधी आहे. या योजनेतील कामांसाठी जिल्ह्यातील २२२ गावे नव्याने निवडण्यात आली आहेत. मात्र, मागील वर्षीची कामे पूर्ण केल्यानंतरच नव्या कामांना सुरुवात करा, असे मत आमदार प्रशांत बंब यांनी टंचाई आढावा बैठकीत व्यक्त केले होते.

ही कामे झाली पूर्ण
जलयुक्तशिवारअंतर्गत अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. यात मातीनाला बांध १९८, खोल सलग चर २७१, शेततळे १०२, नाला खोलीकरण, सरळीकरण ३१, वनराई बंधारे ५, पाझर तलाव दुरुस्ती १४, केटीवेअर दुरुस्ती १२, गाळ काढणे ८३ अशी ४१२२ कामे पूर्ण झाली आहेत़.

५८ कोटींचा निधी खर्च
>जलयुक्त शिवारच्या कामावर आतापर्यंत ५८ कोटी ६५ लाखांचा खर्च झाला आहे.
>२२०सिमेंट बंधाऱ्यांवर सर्वाधिक २६ कोटी ९५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
>२७१ सिमेंट बंधाऱ्यांचे नियोजन असून ५१ बंधाऱ्यांची कामे सुरू
>७८४कंपार्टमेंट बंडिंगच्या कामावर १२ कोटी लाख रुपये खर्च झाले असून ९२ कामे सुरू आहेत.
>विहीर पुनर्भरणातील ९३६ पैकी ४८२ कामे पूर्ण झाली असून ४५४ कामे सुरू आहेत.
>एमआरईजीएसच्या विहिरीच्या ५१८ कामांचे नियोजन होते. यापैकी ७५ कामे पूर्ण, तर ४४३ कामे प्रगतिपथावर आहेत.