आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jamadar Arrested In Aurangabad For Corruption Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत लाचखोर जमादारास अटक; 25 हजार रुपये घेताना पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सावकारी कायद्यानुसार गुन्हा न दाखल करण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागणार्‍या छावणी पोलिस ठाण्यातील जमादाराला लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालय परिसरात रंगेहाथ पकडले. साहेबराव परसराम वाघ (रा. न्यू नंदनवन कॉलनी) असे त्याचे नाव आहे.

बायजीपुरा, इंदिरानगरातील सुमीत वाहूळ (24, रा. गल्ली नं. 25) हा व्याजाने पैसे देत असल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली. प्रकरण छावणी ठाण्याअंतर्गत येत असल्याने पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यांनी या प्रकरणाचा तपास जमादार वाघ यांच्याकडे दिला होता. तक्रार अर्जात वाहूळ यांच्यावर सावकारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदाराने केली होती. वाघ यांनी कायद्याचा बडगा दाखवत वाहूळ यांच्याकडे 25 हजारांची मागणी केली. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. मंगळवारी जमादार येणार असल्याची माहिती मिळताच त्याला पकडण्यात आले.त्याच्याविरुद्ध बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

लाचखोर जमादारास अटक; 25 हजार रुपये घेताना पकडले
प्रतिनिधी